SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बीसीसीआय’कडून संपूर्ण निवड समिती बरखास्त, रोहित शर्मावर टांगती तलवार

टी-20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर ‘बीसीसीआय’ने आता पहिला वार निवडी समितीवर केला आहे. माजी खेळाडू चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण निवड समिती बरखास्त करण्यात आली आहे.

अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासह हरविंदर सिंग, सुनील जोशी व देबाशिष मोहंती यांचा या समितीमध्ये समावेश होता. या सगळ्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.

Advertisement

रोहितवर टांगती तलवार

निवड समितीवर बडगा उगारल्यानंतर आता कॅप्टन रोहित शर्मा याच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. ‘बीसीसीआय’ आता क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटसाठी वेगवेगळे कॅप्टन नेमण्याच्या विचारात आहे.

Advertisement

रोहित शर्माकडे कसोटी व वन-डे संघाचे कर्णधारपद दिलं जाऊ शकते, तर टी-20 संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे कायमस्वरुपी दिलं जाण्याची शक्यता आहे.

आगरकर होणार अध्यक्ष?

Advertisement

निवड समिती बरखास्त केल्यानंतर नवीन अध्यक्षपदासाठी माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. आगरकरने याआधीच अर्ज केला होता. मात्र, आता त्याला अध्यक्षपद मिळण्याची  शक्यता आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement