देशात घडणाऱ्या काही घटना असतील ज्या सध्या आपल्या कानावर अनेक दिवसांपासून येतात. जसे की बलात्कार, खून संबंधित अनेक प्रकरणे कानावर येत आहेत. त्यांचा अधिक तपास करण्यासाठी आरोपीच्या जबाबानंतरही जर पोलीस तपासामध्ये काही उलगडा झाला नाही तर पोलीस प्रशासन नार्को टेस्ट ची मागणी करू शकते.
भारतात घडणाऱ्या काही मोठ्या महत्वाच्या खटल्यांमध्ये पोलीस आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी करतात आणि तपासामध्ये नार्को टेस्टमधील काही गोष्टींचा आधार घेतात. असं तेव्हा केलं जातं जर मोठया गुन्ह्याखाली एखाद्या आरोपीने जबाब दिला तर तो जबाब आणि पोलिसांनी केलेला तपास यामध्ये काही परिस्थिती किंवा सापडलेले पुरावे, यांच्यात फरक जाणवला तर त्या आरोपीकडून गुन्ह्याबाबत खरी माहिती मिळवण्यासाठी नार्को टेस्ट केली जाते.
नार्को टेस्ट कशी केली जाते..?
▪️ एखाद्या आरोपीकडून गुन्ह्याबाबत महत्वाची व खरी माहीती मिळावी यासाठी धागेदोरे सापडावेत म्हणून नार्को टेस्ट केली जाते. समजा गुन्हेगार किंवा संशयित आरोपीकडून सत्य बाहेर काढायचं असेल तर एखाद्या आरोपात ही टेस्ट खूप मदत करते. महत्वाचं म्हणजे न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणाचीही नार्को टेस्ट करता येत नाही.
▪️ मिळालेल्या माहीतीनुसार, आरोपीला ‘ट्रुथ सिरम’ नावाचं एक औषध दिले जाते. अनेकदा सोडियम पेंटोथॉलचे इंजेक्शनदेखील दिलं जातं. हे औषध रक्तात पोहोचताच व्यक्ती अर्धचेतन अवस्थेत पोहोचते. मग उपस्थितांपैकी काही तज्ज्ञ व्यक्ती जसे की डॉक्टर, फॉरेन्सिक तज्ज्ञ, तपास अधिकारी, मानसशास्त्रज्ञ व पोलिस या केससंदर्भात आरोपीला प्रश्न विचारून सत्य बाहेर काढतात. यामध्ये आरोपीच्या शरीराच्या हालचालींवर, हावभावांवर देखील लक्ष ठेवले जाते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in