SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : राहुल गांधींना बाॅम्बने उडवून देण्याची धमकी, इंदूरमध्ये सापडले पत्र, देशभर खळबळ..

काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदूर येथील एका मिठाईच्या दुकानाबाहेर हे पत्र आढळून आले. पोलिस या पत्राबाबत तपास करीत आहेत.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा 20 नोव्हेंबरला मध्य प्रदेशमधील बुऱ्हाणपूरमध्ये दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये धमकीचे पत्र सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

मिठाईच्या दुकानाबाहेर पत्र

इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानाबाहेर आज (ता. 18) सकाळी हे पत्र आढळले. त्यात भारत जोडो यात्रा इंदूरमध्ये आल्यावर राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हे पत्र दुकानाबाहेर टाकल्याचे समजते.

Advertisement

पोलिसांनी या दुकान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून, त्याआधारवर आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement