SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामना रद्द? समोर आलं ‘हे’ कारण..

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिल्या टी-20 सामन्याला आज सुरुवात होणार तेवढ्यात पावसाने व्यत्यय आणल्याने सामना सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा आली आहे. आधी नाणेफेक करण्यास उशीर होणार होता असं बीसीसीआयने सांगितलं होतं. पण आता भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द करण्यात आला आहे. या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, न्यूझीलंडमधील वेलिंग्टनमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याचं समजतंय. आज (18 नोव्हें.) दुपारी 12 वाजता टी-20 सामना सुरू होणार होता. पण अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज नाणेफेक देखील झाली नाही. यामुळे सामना होण्याची शक्यता कमी दिसत आहे. पाऊस थांबण्याची शक्यता कमीच असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.

Advertisement

टी-20 वर्ल्डपमधून फायनलमध्ये न पोहोचताच बाहेर झालेल्या टीम इंडियामध्ये नाराजीचं वातावरण आहे. आता टीम इंडिया दिमाखात आपला फॉर्म दाखवत आजच्या सामन्यात विजय मिळवेल, असं वाटत असताना सामना रद्द झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. यंदाच्या टी-20 मालिकेत कुलदीप सेन, उमरान मलिक, इशान किशन, सुर्यकुमार यादव, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्यासारख्या युवा खेळाडूंचा खेळ बघता येणार आहे.

प्राप्त माहीतीनुसार, आजचा सामना सुरू होण्यापूर्वीच सुरू झालेल्या पावसामुळे आजचा सामना रद्द झाला आहे. मात्र दुपारी 2.17 वाजताचा कट ऑफ टाईम ठेवला गेला होता. पण पाऊस जोरदार पडत असून ही वेळ देखील रद्द करत 1 वाजेच्या जवळपास भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत रद्द करण्याचा निर्णय झाला. विशेष म्हणजे काही सिनियर खेळाडूंना विश्रांती दिल्याने व काही खेळाडूंचा फॉर्म नसल्याने अनेक युवा खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यात स्थान मिळाले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement