SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर, शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा…

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतून दरवर्षी 4 हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

शेतकऱ्यांना दरवर्षी 75 हजार रुपये

Advertisement

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प सुरु करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून भाडेपट्ट्यावर जमीन घेणार आहे. ही जमीन महावितरण, महानिर्मिती व महाऊर्जा संस्थेस दिली जाईल. या जागेपोटी शेतकऱ्यांना दरवर्षी 75 हजार रुपये प्रति हेक्टर भाडे मिळणार आहे.

राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या जमिनींचा समावेश निविदा प्रक्रियेत केला आहे. सौर ऊर्जा प्रकल्प धारक जमिनींची निवड करतील. सौर ऊर्जा निर्मितीचे देयक भाडेपट्टीपेक्षा कमी असल्यास, भाडेपट्टीची रक्कम देण्याची जबाबदारी प्रकल्प धारकावर असेल.

Advertisement

प्रत्येक जिल्ह्यात ही योजना राबवली जाणार असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती गठीत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement