टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये विजेता ठरलेल्या इंग्लंड संघाने आपल्या नावावर 2007 पासून मिळवलेला दुसरा टी-20 वर्ल्डकप ठरला. यंदा ऑस्ट्रेलियात आयोजित केलेला हा वर्ल्डकप मोठ्या संघांना धक्का देणारा ठरला. यामध्ये बक्षिसाची रक्कम देखील तगडी दिली गेली आहे.
काल (ता. 13 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान या फायनल सामन्यात विजेता ठरलेल्या इंग्लंडला बक्षिस म्हणून ट्रॉफीसह मोठी रक्कम मिळाली, तर पराभव झालेल्या पाकिस्तान संघाला उपविजेता असल्याने इंग्लंडला मिळालेल्या रकमेच्या निम्मी रक्कम मिळाली. याशिवाय यंदाच्या वर्ल्डकप मध्ये सेमिफायनल आणि सुपर-12 मध्ये पात्र झालेल्या संघानाही काही रक्कम मिळाली आहे, ती जाणून घ्या..
कोणत्या संघाला किती बक्षिस..?
▪️ 1) इंग्लंड – 1600000 डॉलर्स (अंदाजे 13 कोटी 20 लाख रुपये)
▪️ 2) पाकिस्तान – 800000 डॉलर्स (अंदाजे 6 कोटी 60 लाख रुपये)
▪️ 3) सेमी फायनलमध्ये पराभव झालेल्या प्रत्येक संघाला – 400000 डॉलर्स. (अंदाजे 3 कोटी 30 लाख रुपये)
▪️ 4) सुपर-12 स्टेजमध्ये प्रत्येक सामन्यात विजय मिळवलेल्या संघांना – 40000 डॉलर्स (अंदाजे 33 लाख रुपये)
▪️ 5) सुपर-12 स्टेजमधून बाहेर पडलेल्या 8 संघांना – 70000 डॉलर्स (अंदाजे 57 लाख 75 हजार रुपये)
टी-20 वर्ल्डकप विजेता संघ:
• 2007- भारत
• 2009- पाकिस्तान
• 2010- इंग्लंड
• 2012- वेस्ट इंडिज
• 2014- श्रीलंका
• 2016- वेस्ट इंडिज
• 2021- ऑस्ट्रेलिया
• 2022- इंग्लंड
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in