SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कंपनीने स्कुटरचे 3 मॉडेल्स केले लॉंच, एका चार्जवर धावणार तब्बल 97 किमी..??

जगात आता इलेक्ट्रिक व्हेईकलची चलती असून आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात येत असताना
Piaggio ने आपल्या Piaggio 1 नावाच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सिरीजमध्ये आणखी काही खास भर घातली आहे. यासह कंपनीने आता इलेक्ट्रिक स्कुटरचे चक्क 3 मॉडेल इटलीतील मिलान येथील 2022 EICMA मध्ये लॉंच केले आहेत.

कंपनीने कोणते 3 मॉडेल केले लॉंच?

Advertisement

Piaggio 1, Piaggio 1+ आणि Piaggio 1 Active असे 3 मॉडेल कंपनीने सादर केले आहेत. या विविध रंगांच्या, मॉडेल्सच्या स्कुटरमध्ये वेगवेगळे टॉप स्पीड दिल्याचं समोर आलं आहे.

Piaggio 1 2023 इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये:

Advertisement

▪️ Piaggio 1 आणि Piaggio 1+ मध्ये टॉप स्पीड 45km/h
▪️ Piaggio 1 ची रेंज – 55km
▪️ Piaggio 1+ ची रेंज – 97km
▪️ Piaggio 1 Active चा टॉप स्पीड – 60km/h
▪️ तिन्ही स्कूटरमध्ये रिमूव्हेबल बॅटरी सेटअप
▪️ शहरी रस्त्यांवर गाडी चालवण्यासाठी अतिशय उत्तम.

कंपनीने दिलेल्या माहीतीनुसार, इंस्ट्रुमेंटेशन पॅनेल, स्कूटरला डिजिटल एलईडी लाइटिंग आणि की-लेस ऑपरेशन मिळते, असे काही खास फीचर्स दिले आहेत. याशिवाय या स्कुटरच्या सीटखालीही पुरेशी जागा आहे, जिथे आपण हेल्मेट व इतर काही महत्वाच्या वस्तू ठेवू शकतो. भारतात येत्या काही महिन्यात ही स्कुटर येण्याचा अंदाज आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement