SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला अटक, ‘या’ प्रकरणात पोलिसांकडून कारवाई..

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये घुसून आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करीत, राज्यातील विविध संघटनांनी या चित्रपटाला विरोध केला आहे. राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी या चित्रपटाचे शो बंद पाडले होते.

Advertisement

शंभर जणांविरुद्ध गुन्हे

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये घुसून आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यावेळी प्रेक्षकाला मारहाण झाल्याचंही समोर आलं होतं. याप्रकरणी ठाण्यातील वर्तक नगर पोलिस ठाण्यात शंभर जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

Advertisement

या प्रकरणात आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.  आव्हाड यांना अटक झाल्याचं कळताच, त्यांच्या कार्यकर्त्यांनी वर्तक नगर पोलिस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement