SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फोर्ब्सच्या रँकिंगमध्ये भारताच्या ‘या’ कंपनीचा बोलबाला, जगभरात डंका..

भारतातील अनेक कंपन्या अशा आहेत ज्या मागील काही दशकांपासून आजही प्रगती करत आहेत. काही कंपन्यांनी आपले जाळे जगभरात पसरवले आहे तर काही भारतात आपला बिझनेस अजूनही संघर्षात करत आहेत. अशातच भारतातील ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ने आता जगभरात आपला डंका वाजवला आहे.

फोर्ब्सच्या वर्ल्ड्स बेस्ट एप्लॉयर रँकिंग 2022 नुसार..

Advertisement

फोर्ब्स (Forbes) ने वर्ल्ड्स बेस्ट एप्लॉयर रँकिंग 2022 ची नुकतीच घोषणा केली असून या यादीत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ने 20वा क्रमांक पटकावला आहे. तर भारतात ही कंपनी देशातील सर्वोत्तम कंपनी म्हणून पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.

फोर्ब्सने जाहीर केलेल्या Forbes Best Employer 2022 नामांकित कंपन्यामध्ये भारताच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने महसूल, फायदा आणि बाजारातील भांडवल या तीन गोष्टींच्या आधारावर या रँकिंगमध्ये 20वा क्रमांक पटकावला. कंपनीत सध्या 2,30,000 इतके कर्मचारी काम करतात. कंपनीने जर्मनीतील मर्सिडीज बेंज, अमेरिकन कोका-कोला, जपानची होंडा आणि यामाहा तर सौदी अरबमधील अरामको कंपनीला मागे टाकले आहे.

Advertisement

जगभरातील सर्वोत्तम कंपन्यांच्या या यादीत फोर्ब्सच्या ग्लोबल रॅकिंगमध्ये दक्षिण कोरियाची सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स पहिल्या क्रमांकावर आहे. मग अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट, आयबीएम (IBM), अल्फाबेट (Alphabet) आणि ॲपल (Apple) यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे सॅमसंग जरी पहिल्या क्रमांकावर असली तरी तिथून पुढे सलग 11 कंपन्या या अमेरिकन कंपन्या आहेत, ज्या 2 ते 12 व्या क्रमांकावर आहेत.

जगभरातील या कंपन्यांच्या यादीत फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीमध्ये 13 व्या क्रमांकावर जर्मनीची ऑटोमोबाईल कंपनी बीएमडब्ल्यू (BMW) ही आहे. मग जगभरात ज्ञात असणारी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन 14 व्या क्रमांकावर
तर फ्रांसची स्पोर्टस् कंपनी डीकॅथलॉन 15 व्या क्रमांकावर आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement