SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सलमान खान, अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ, ‘असे’ असणार सुरक्षा कवच..!

गेल्या काही दिवसांत बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे सलमानला ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच सलमानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने सलमानच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्यानंतर आता त्याला ‘वाय प्लस’ श्रेणीची सुरक्षा दिली आहे.

Advertisement

अमृता फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ

सोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही ‘वाय प्लस’ सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे आता सलमान खान व अमृता फडणवीस यांच्यासोबत सतत चार शस्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत.

Advertisement

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनाही ‘वाय प्लस’ सुरक्षा दिली आहे.  2005 पासूनच नार्वेकरांना सुरक्षा आहे. 2019 मध्ये ही सुरक्षा ‘एक्स’ दर्जाची केली होती. आता ती वाढवून ‘वाय प्लस’ केली आहे.

तसेच, भारताचे सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांचे नातेवाईक अजय पिरामल यांनाही आता ‘वाय प्लस’ सुरक्षा कवच असेल. अंबानी कुटुंबाला सातत्याने धमक्या येत असल्याने सुरक्षा वाढवली आहे. तसेच, अभिनेता अनुपम खेर यांच्याही सुरक्षेतही वाढ केली आहे.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement