SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सलमान खानला ‘या’ आजाराची लागण, चाहत्यांना मोठा धक्का..

बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. चाहत्यांना आता मोठा धक्का बसला आहे, कारण लोकप्रिय शो बिग बॉसचे शूटिंग सलमान खान (salman khan dengue news) काही दिवसांपासून करत नाहीये. आता बिग बिस सीझन-16 ची सूत्रे कोणाच्या हाती येणार, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, बिग बॉसची सूत्रे काही दिवस एका प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शकाकडे देण्यात आल्याचं कळतंय. रिपोर्टनुसार, मागील चार-पाच दिवसांपासून सलमान खानची तबीयत बिघडली आहे. आता करण जोहर काही आठवड्यांसाठी बिग बॉसचा यंदाचा सीझन-16 होस्ट करणार असल्याची माहीती आहे. सलमान खान बिग बाॅसमध्ये दिसणार नसल्याने याचा परिणाम बिग बाॅसच्या टीआरपीवर पडेल असं अनेकांचं म्हणणं आहे.

Advertisement

सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाची शूटिंग करत असताना त्या दरम्यान त्याला डेंग्यूची लागण झाली. यांनंतर त्याची तबियत बिघडत चालली. सलमान खानची प्रकृती सध्या बिघडल्याने त्याचं सर्वच शूटिंग थांबवण्यात आलं आहे. त्याच्या तब्येतीमुळे सलमान बिग बाॅसमधील घरातील सदस्यांचा क्लास घेताना काही दिवस दिसणार नाहीये.

आता यंदाच्या सीझनमध्ये ‘वीक एंड का वार’ मध्ये सलमान खान नव्हे तर करण जोहर असणार आहे. नुकताच वीक एंड का वार चा प्रोमोही आला आहे ज्यात करण जोहर बिग बॉसमधील सर्व स्पर्धकांची शाळा घेताना दिसत आहे. सलमान खानच्या जागी बोलावण्यात आलेल्या करण जोहरला सलमान खानची तबियत जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत शो ची सूत्र करण जोहरच्या हातात राहणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement