SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हिरो’ स्कूटर्सच्या किंमतीत मोठे बदल, ग्राहकांना बसणार फटका..

नवरात्रोत्स व दसऱ्याच्या मुहूर्तावर भारतीय वाहन बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. या काळात नागरिक मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करीत असतात. या पार्श्वभूमीवर अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी घसघशीत डिस्काऊंट जाहीर केले आहेत.

अन्य कंपन्या वाहनांवर सवलती जाहीर करीत असताना, हिरो कंपनीच्या तीन स्कूटर्सच्या किंमती वाढल्या असून, एका स्कूटरच्या किंमतीत घट झाली आहे.

Advertisement

हिरो प्लेजर प्लस xTEC

हिरोची ही स्कूटर 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये 4.8 लिटर क्षमतेचा फ्यूअल टँक असून, 110.9 सीसी क्षमतेचं इंजिन दिलेले आहे.
जुनी किंमत – 75,300 रुपये
नवी किंमत – 75,868 रुपये

Advertisement

हिरो डेस्टिनी 125 Xtech

बाजारात ही स्कूटरही 7 रंगात उपलब्ध आहे. त्यामध्ये 7 लिटरचा फ्यूअल टँक असून, 124.6 सीसी क्षमतेचं इंजिन आहे.

Advertisement

जुनी किंमत – 82,290 रुपये
नवी किंमत – 82,908 रुपये

हिरो मायस्ट्रो एज 125

Advertisement

भारतात 6 रंगात ही स्कूटर उपलब्ध आहे. त्यात 5 लिटरचा फ्यूल टँक असून, 124.6 सीसी क्षमतेचं इंजिन आहे.

जुनी किंमत – 85,948 रुपये
नवी किंमत – 86,066 रुपये

Advertisement

हिरो मायस्ट्रो एज 110

बाजारात ही स्कूटर 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 5 लिटर क्षमतेचा फ्यूल टँक असून, 110.9 सीसी क्षमतेचं इंजिन आहे.

Advertisement

जुनी किंमत – 73,698 रुपये
नवी किंमत – 73,616 रुपये

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 http://spreaditnow.in/

Advertisement