SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दसऱ्याआधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आणखी भाववाढीचे संकेत

नवरात्रीच्या नवव्या दिवशी आज (मंगळवारी) सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. बुधवारी (ता. 5) दसरा सण असल्याने सोने-चांदी खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढलाय. त्यामुळे सोने-चांदीच्या दरात तेजी दिसत आहे.

‘गुड रिटर्न’ वेबसाइटनुसार, भारतीय सराफ बाजारात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच, 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,660 रुपये प्रति तोळा आहे. सोमवारच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रुपयांची वाढ झाली आहे.

Advertisement

चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसते आहे. आज चांदी 57,400 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 56,900 रुपये प्रतिकिलो होती.

24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति तोळा)

Advertisement
  • चेन्नई – 51,330 रुपये
  • दिल्ली – 51280 रुपये
  • हैदराबाद – 41,110 रुपये
  • कोलकत्ता – 51,110रुपये
  • लखनऊ – 51,280 रुपये
  • मुंबई – 51,110 रुपये
  • नागपूर – 51,140 रुपये
  • पुणे – 51,140 रुपये

सणासुदीचा परिणाम व्यवसायावर होत असून, देशांतर्गत सोन्या-चांदीला मागणी वाढली आहे. दिवाळीपूर्वी करवा चौथ व धनत्रयोदशीच्या सणाला सोन्या-चांदीची खरेदी वाढण्याचे संकेत आहेत.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 http://spreaditnow.in/

Advertisement