SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दिवाळीला फक्त 100 रुपयांत मिळणार ‘या’ चार वस्तू, राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने ‘दिवाळी गिफ्ट’ दिले आहे. यंदाच्या दिवाळीत गोरगरीबांना फक्त 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर व तेलाचे पॅकेट दिले जाणार आहे..

राज्यातील तब्बल 1 कोटी 70 लाख कुटुंबांना, म्हणजेच 7 कोटी लोकांना या निर्णयाचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

100 रुपयांत काय मिळणार?
– साखर
– रवा
– चणा डाळ
– तेल
(सगळ्या वस्तू प्रत्येकी एक किलो)

मंत्रीमंडळाचे अन्य निर्णय

Advertisement

– आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमणार (मदत व पुनर्वसन विभाग)
– पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देणार (गृह विभाग)

– नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार. सुधारित खर्चास मान्यता. (नगर विकास विभाग)
– भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देणार. योजनेस सुधारीत प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
– उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती देणार. सुधारित खर्चास मान्यता. (जलसंपदा विभाग)

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 http://spreaditnow.in/

Advertisement