SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक, पोलिस तपासात भलतंच आलं समोर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जिवे मारण्याचाही कट रचल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. गुप्तचर विभागासह पोलिस प्रशासनाचेही धाबे दणाणले होते. या प्रकाराचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासन कामाला लागले होते..

अखेर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आत्मघातकी हल्ला करण्याबाबत कटाची खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. अजय वाघमारे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.. चौकशीदरम्यान त्याची माहिती ऐकून पोलिसांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली.

Advertisement

फक्त 5 रुपयांसाठी….

आरोप अजय वाघमारे हा मूळचा आटपाडीचा रहिवासी.. मुंबईला जात असताना, लोणावळ्यातील एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी तो थांबला होता. त्यावेळी तेथील हॉटेलमालकाने त्याला 10 रुपयांची पाण्याची बाटली 15 रुपयांना दिली. त्यावरुन त्याचा हॉटेलमालकासोबत वादही झाला..

Advertisement

दारुच्या नशेत असलेल्या अजय वाघमारे याने हाॅटेलमालक व तेथील मॅनेजरला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. पाण्याच्या बाटलीचे 5 रुपये जास्त लावल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजर व तेथील कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा उद्देशाने त्याने पोलिसांना हाॅटेलच्या फोनवरून काॅल केला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिवाला धोका असून, आत्मघातकी स्फोट घडवून त्यांना जिवे मारण्याचाही कट रचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समजताच, सारी पोलिस यंत्रणा, राज्याचा गुप्तचर विभाग कामाला लागला. अखेर या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

Advertisement

पोलिसांना खोटी माहिती देऊन यंत्रणेची धावपळ करणाऱ्या आरोपी अजय वाघमारे यास पोलिसांनी अटक केली आहे. लोणावळा शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना आलेला धमकीचा फोन काॅल खोटा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस प्रशासनाचा जिव भांड्यात पडला..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement