SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कंपनीने लॉंच केले दोन बजेट स्मार्टफोन, जाणून घ्या खास फीचर्स..

सध्या अनेक मोबाईल कंपन्यांनी आपले बरेचशे स्मार्टफोन यंदा सणासुदीच्या काळात लॉंच केले आहेत. काही कंपन्या दिवाळीला आपले काही स्मार्टफोन लॉंच करून आता ओप्पो कंपनीने नवरात्रीच्या मुहूर्तावर आपले दोन धमाकेदार स्मार्टफोन लॉंच केले आहेत. Oppo A77s आणि Oppo A17 नावाने हे स्मार्टफोन भारतात दाखल झाले आहेत.

ओप्पो कंपनीने सादर केलेले दोन्ही स्मार्टफोन आता ग्राहकांना ऑफलाईन रिटेल स्टोअरमध्ये खरेदी करता येणार आहेत. ऑफलाईन स्टोअर मध्ये हे स्मार्टफोन्स उपलब्ध झाले असून Oppo A77s बद्दल बोलायचं झालं तर 8GB रॅम आणि 128GB इंटरर्नल मेमरीसोबत येतो. त्याची किंमत 17,999 रुपये आहे. तर Oppo A17 हा स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. Oppo ने या फोनची किंमत 12,499 रुपये ठेवली आहे.

Advertisement

Oppo A77s चे इतर आकर्षक फीचर्स व स्पेसिफिकेशन्स:

▪️Oppo A77s मध्ये HD+ रिझोल्युशन मिळेल.
▪️ 90Hz रिफ्रेश रेट सह 6.56-इंचाचा LCD पॅनल मिळेल.
▪️फोन 8 GB रॅम आणि 128 GB इंटरर्नल मेमरीसह मिळणार.
▪️फोन स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट प्रोसेसरने सुसज्ज.
▪️ फोनच्या मागील बाजूस कंपनी एलईडी फ्लॅशसह 50MP चा डुअल कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देते.
▪️या फोनमध्ये 5000mAh बॅटरी येते जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Advertisement

Oppo A17 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

▪️ Oppo A17 स्मार्टफोनमध्ये 60Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा डिस्प्ले येईल.
▪️ या स्मार्टफोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरर्नल मेमरी मिळेल.
▪️ यामध्ये प्रोसेसर MediaTek Helio G35 चिपसेट वर काम करेल.
▪️ 50MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप तर सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP कॅमेरा येईल.
▪️5000mAh बॅटरी मिळेल जी मायक्रो यूएसबी पोर्टने चार्ज होईल.

Advertisement

(देशातील अनेक स्टोअरमध्ये शहरानुसार स्मार्टफोनच्या किंमतीत किंचित बदल होऊ शकतो.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement