SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

30 सप्टेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ यूपीएससीकडून UPSC Official App लॉंच, Google Play Store वरून डाऊनलोड करता येणार; विद्यार्थ्यांना हवी असलेली सर्व माहिती मिळणार

✒️ राज्यात आता पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस – हवामान विभाग

Advertisement

✒️ अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या जून ते ऑगस्ट 2022 मधील बाधित शेतकऱ्यांना 5 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार, राज्य सरकारकडून 755 कोटींची मदत जाहीर

✒️ केंद्र सरकारकडून इंटरनेट कंपन्यांना पॉर्न वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे आदेश; 67 पैकी 63 वेबसाइट्सला पुणे तर 4 वेबसाइट्सला उत्तराखंड हायकोर्टाच्या आदेशाने केले ब्लॉक

Advertisement

✒️ राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी मिळणार, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेससोबत (TISS) राज्य सरकारचा करार

✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे केले उद्घाटन, 15 हजार खेळाडू, कोच आणि अधिकारी पोहोचले; गुजरातमध्ये पहिल्यांदाच नॅशनल गेम्स होणार

Advertisement

✒️ गौतम अदानी यांची चौथ्या स्थानावर घसरण, फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीनुसार त्यांच्याकडे सध्या 135 बिलियन डॉलर्स एवढी संपत्ती

✒️ अखिलेश यादव तिसऱ्यांदा झाले सपाचे अध्यक्ष, म्हणाले – देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात असताना माझ्यावर सोपवलेली अध्यक्षपदाची जबाबदारी खूप मोठी

Advertisement

✒️ रशियाने युद्धात जिंकलेले युक्रेनचे 4 प्रदेश अधिकृतरित्या रशियाला जोडण्याचा घेतला निर्णय; लुगांस्क, डोनेस्तक, खेरसन, झापोरिझ्झिया हे आज रशियाचा भाग होणार

✒️ टोयोटा किर्लोस्कर मोटरने अर्बन क्रुझर हायरायडर कार केली भारतात लाँच, बेस व्हेरियंटची किंमत 10.48 लाख तर टॉप व्हेरीयंटची किंमत 18.99 लाख रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement