SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन:शांती मिळेल. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. तुमचा विश्वास वाढत आहे. प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आज तुम्ही बिझनेसमध्ये उल्लेखनीय प्रगती कराल. तुम्हाला परदेशी स्रोतांतून उत्पन्न मिळवण्याच्या संधी मिळू शकतील. तुमचं दैनंदिन उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ (Taurus): मानमरातब वाढेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आज तुमच्या दिवसाची सुरुवात खर्चानेच होईल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं हा खर्च ठरू शकतो. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

Advertisement

मिथुन (Gemini) : सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. सरकारी आणि खासगी अशी दोन्ही कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल. स्थावर मालमत्तेच्या कामातून लाभ होईल. घरात चांगल्या बातम्या येतील. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

कर्क (Cancer) : सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबियांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी कराल. इच्छापूर्तीचा दिवस. परदेशातून तुम्ही काही पैसे कमावण्याची शक्यता आहे. विवाहितांचा आज मुलांवर खर्च होईल. रिअल इस्टेट आज नफा देणारी ठरेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

Advertisement

सिंह (Leo) : दिवस कार्यपूर्तीत जाईल. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आजारावर जास्त पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला भविष्यातील खर्चाची चिंता वाटू शकते. आज तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागेल. जीवनशैलीत केलेल्या बदलांमुळे खर्च वाढू शकतील. सरकारी योजनांमधून मिळालेल्या नफ्यात काही अडथळे येतील.

कन्या (Virgo) : मजबूत आर्थिक परिस्थितीमुळे जीवनशैलीत सुधारणा होईल. शेअर मार्केटमधून नफ्याची अपेक्षा करू शकता. बिझनेसमध्ये भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता भासेल.दिवसाची सुरुवात आनंदी होईल. आज तुमच्या मनातील इच्छेला अधिक बळ मिळेल. अडचणीतून मार्ग निघेल. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील

Advertisement

तुळ (Libra) : अतिउत्साह दाखवायला जाऊ नका. नवीन सोयी कराल. नवीन गोष्टीत रमून जाल. आर्थिक गुंतवणुकीपासून दूर राहावं लागण्याची शक्यता आहे. आज तुमच्यासाठी परदेशी गुंतवणूक नफ्याची ठरेल. व्यवहार सावधानतेने करावेत. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

वृश्‍चिक (Scorpio) : कलात्मक आनंद देणा-या कामात स्वत:ला गुंतवून घ्या आणि आजाराशी सामना करण्यास तयार राहा. गोष्टी मनासारख्या घडून येतील. बदलाची अपेक्षा कराल. अतिउत्साह दाखवायला जाऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. तुमचे निर्णय मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल.

Advertisement

धनु (Sagittarius) : मानसिक चिंतेला बाजूला सारावे. स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना काढून टाका. अविवाहित व्यक्ती आज त्यांच्या कुटुंबीयांवर खर्च करण्याची शक्यता आहे. पूर्वजांच्या संपत्तीत वाटण्या झाल्यामुळे तुम्हाला तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. लपवाछपवीची कामे करू नका. बदलाची अपेक्षा कराल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मकर (Capricorn) : मानसिक चिंतेला बाजूला सारावे. स्वत:विषयीच्या चुकीच्या कल्पना काढून टाका. ट्रान्स्पोर्ट बिझनेस किंवा जॉब आज नफा देणारा ठरेल. विनाकारण पैसे खर्च करणं तुम्हाला कर्जात नेऊ शकेल. धार्मिक सहली किंवा तीर्थयात्रांमुळे आज तुमचा मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. लपवाछपवीची कामे करू नका. कोणालाही जामीन राहू नका.

Advertisement

कुंभ (Aquarious) : मनोवांच्छित लाभेल. चर्चेतून कोंडी फुटेल. वाहन जपून चालवावे. भविष्या संदर्भातील एखादी योजना आखाल. पैसे उभे करण्यासाठी तुम्ही जुनी प्रॉपर्टी विकू शकाल. कुटुंबातल्या सदस्यांकडून तुम्ही आर्थिक नफ्याची अपेक्षा करू शकता. निराशेतून मार्ग काढाल. आजचं उत्पन्न खूप समाधानकारक असेल. खासगी उद्योगांमधून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

मीन (Pisces) : कामापेक्षा इतर गोष्टींकडे लक्ष जाईल. व्यापारी वर्ग खूश राहील. धावपळीतून यशाचा मार्ग खुला होईल. कामात सुलभता येईल. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. आज बिझनेसमधला कामाचा ताण बऱ्यापैकी कमी असेल; मात्र तरीही तुम्ही दैनिक उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा करू शकाल. छोट्या पातळीवरचे उद्योग मोठा नफा कमावतील.

Advertisement