SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): आवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा. आज प्रेमाची अनुभूती येईल. मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. नकारात्मक विचार सोडून द्यावेत. आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. उत्साहवर्धक घटना घडतील. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील.

वृषभ (Taurus): कामासाठी बाहेर राहावे लागेल. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. घराबाहेर बेसावधपणे वागू नये. कामाचा बोजा वाढू शकतो. समस्येतून मार्ग निघेल. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

Advertisement

मिथुन (Gemini) : आर्थिक आवक वाढेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. मेहनतीला पर्याय नाही. यश विलंबाने पदरात पडेल. ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या.

कर्क (Cancer) : सामाजिक कामात सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ टाळावी. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मुलांमुळे घर खेळकर राहील. करमणुकीवर भर द्यावा. घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

Advertisement

सिंह (Leo) : जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. मनातील गैरसमज दूर होतील. आर्थिक चिंता मिटेल. मन प्रसन्न राहील. प्रलोभनापासून दूर राहावे. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील.

कन्या (Virgo) : जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे. व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. काम जास्त होईल पण तब्येत ठीक राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि त्यांच्या सहकार्याने कामे पूर्ण होतील.

Advertisement

तुळ (Libra) : गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात. वादामुळे मन खिन्न होऊ शकते. इतरांवर विसंबून राहू नका. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.

वृश्‍चिक (Scorpio) : सामाजिक बांधीलकी जपावी. तुमच्याकडील कलेचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांना सांभाळावे लागेल. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल. पारिवारीक सुखात वृध्दीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. मुलांना शिस्त लावा.

Advertisement

धनु (Sagittarius) : घरातील वातावरण संमिश्र राहील. नवीन ओळखी वाढतील. जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. व्यावसायिक क्षेत्रातून लाभ होईल. भागिदारीतून नफा कमवाल. गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. मानप्रतिष्ठा भंग पावेल. व्यवसायिकांना नवीन संधी चालून येतील. आर्थिक स्थिती सुधारता येईल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील. घरातील मोठ्यांनी आपला राग मुलांवर काढू नये.

मकर (Capricorn) : तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. अथक मेहनतीचे चांगले फळ मिळेल. अनुभावातून धडा घ्यावा. मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका. धार्मिक अनुष्ठानात दिवस घालवावा. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक.

Advertisement

कुंभ (Aquarious) : मुलांशी वाद होऊ शकतो. भावनिक घटना घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे. घाईगडबड टाळावी. अचानक धनलाभाची शक्यता. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील.

मीन (Pisces) : मनाची चंचलता आवरावी. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. वरिष्ठांना नाराज करू नका. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाच लपवाछपवी करू नका. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. जिभेवर ताबा ठेवा.

Advertisement