SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताचा आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय, ‘या’ युवा खेळाडूंची दमदार कामगिरी..

दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाविरुद्ध (Ind vs SA T-20 Series) काल (ता. 28 सप्टेंबर) झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात अक्षरशः लोटांगण घातले. या सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्सनं पराभव केला आहे. यांसह तीन T-20 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या संघात भारताचा वेगवान यूवा गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आणि दीपक चाहरचा (Deepak Chahar) संघात समावेश होताच त्यांनी दक्षिण आफ्रिकेची प्रथम फलंदाजी असताना दाणादाण उडवली. भारताने दक्षिण आफ्रिकेला केवळ 106 धावांवर रोखलं.

Advertisement

प्रत्यूत्तरात 107 धावांचा पाठलाग करताना भारतालाही आफ्रिकेने लवकरच एकामागून एक 2 धक्के दिले. कारण भारताच्या फक्त 9 धावा असताना कर्णधार रोहित शर्मा झेलबाद झाला. तर विराट कोहलीने 9 चेंडूत 3 धावा करत नॉर्खियाच्या गोलंदाजीचा झेलबाद झाला. यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादवने आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक करत 33 चेंडूत नाबाद 50 धावा व सलामीवीर के. एल. राहुलने 56 चेंडूत नाबाद 51 धावा करत भारताला 16.4 षटकांत विजय मिळवून दिला.

भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चाहर, अर्शदीप सिंह.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन:
क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रॉसो, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कगिसो रबाडा, केशव महाराज, ऑनरिक नॉर्टजे, तबरेझ शाम्सी.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement