SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नवरात्रीत खरेदी करा नवी बाईक.. ‘हिरो’कडून धमाकेदार ऑफर्स जाहीर…

यंदा दसरा सणाच्या मुहूर्तावर नवी बाईक खरेदी करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. देशातली सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी ‘हिरो मोटोकॉर्प’ने त्यांच्या गाड्यांवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनीने त्यांच्या ‘ग्रँड इंडियन फेस्टिव्हल ऑफ ट्रस्ट’अंतर्गत ही सूट दिली आहे.

हिरो माेटोकाॅर्प (Hero Motocorp) कंपनीच्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या काळासाठीच या ऑफर्स वैध असतील. यंदा नवरात्रीत हिरोच्या गाड्यांवर 5000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. हिरो कंपनीच्या ऑफर्सबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘हिरो’च्या ऑफर्सबाबत…

  • हिरो मोटोकॉर्पच्या कम्यूटर व प्रीमियम बाइक्सवर 2100 रुपयांची रोख सूट देत आहेत. या ऑफर्समध्ये ‘हिरो एचएफ डिलक्स’, ‘स्प्लेंडर प्लस’, ‘पॅशन प्रो’, ‘ग्लॅमर’सारख्या बाइक्सचा समावेश आहे.
  • कंपनीकडून त्यांच्या ‘प्लेजर प्लस’, ‘मायस्ट्रो एज’, ‘डेस्टिनी-125’ सारख्या स्कूटर्सवर 3000 रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे.
  • ‘सुपर सिक्स धमाका पॅकेज’अंतर्गत हिरोच्या स्कूटर्स खरेदी करता येतील. त्यात एक वर्षाचा विमा, 2 वर्षांचा मोफत मेन्टेनन्स, 3000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 4000 रुपयांचं ‘गुड लाईफ’ गिफ्ट व्हाऊचर, 5 वर्षांची वॉरंटी व शून्य टक्के व्याजासह 6 महिन्यांच्या ‘ईएमआय’चा पर्याय मिळणार आहे..

‘हिरो’ कंपनीच्या प्रीमियम रेंजमधील बाइक्सवरही मोठ्या ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात ‘160 आर’, ‘एक्सपल्स 200’ आणि ‘स्ट्रीम 200 एस’ या बाईक्सवर 5000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे. दसरा-दिवाळीनिमित्त कंपनीकडून नवीन उत्पादनं लाँच केलं जाण्याची शक्यता आहे..

Advertisement

काही दिवसांपूर्वीच ‘हिरो’ने ‘एक्स्ट्रीम 160R स्टेल्थ एडिशन 2.0’ ही बाईक (Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0) लाँच केली. या बाईकची किंमत 1.30 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. नवीन स्टेल्थ एडिशनमध्ये ‘मॅट ब्लॅक’ आणि ‘रेड इन्सर्ट’ या रंगांचे पर्याय दिले असून, नवीन रंगात ही बाइक अधिक आकर्षक दिसत आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement