SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘व्हाॅटसअ‍ॅप’ वापरायचंय, तर आधी ‘हे’ काम करा, नाहीतर जेल नि 50 हजारांचा दंड होणार..

स्मार्टफोन हातात आल्यापासून सोशल मीडियाचा विस्तार प्रचंड वेगानं झालाय.. त्यातही जगात सर्वाधिक वापरले जाते ते ‘व्हाॅटसअ‍ॅप’.. मात्र, गेल्या काही दिवसांत या सोशल मीडियाचा वापर चुकीच्या कारणांसाठी झाल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने सोशल मीडिया युजर्ससाठी मोठा निर्णय जाहीर केला आहे..

आगामी काळात ‘व्हाॅटसअ‍ॅप’, टेलिग्राम अशा सोशल मीडिया ‘अ‍ॅप’वर तुम्हाला ओळख लपवणे चांगलेच महागात पडणार आहे.. अशा प्रकारे ओळख लपवून तुम्ही एखाद्याशी चॅट करीत असल्याचे उघड झाल्यास, जेलवारी करावी लागू शकते, शिवाय 50 हजार रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो..

Advertisement

तसेच, आता तुम्हाला सिमकार्डची ओळखही लपवता येणार नाही. बनावट ओळखपत्रावर सिम ठेवल्याचे समोर आल्यास, वरीलप्रमाणेच शिक्षा होऊ शकते.. दूरसंचार विधेयकाच्या कलम 7 मधील उप-कलम 4 नुसार मोबाईल युजर्सना आता त्यांची खरी ओळख नेहमी उघड करावी लागणार आहे.

याबाबत दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच माहिती दिली. ते म्हणाले, कायद्यातील मसुद्यानुसार, अशा प्रकरणात पोलिस वॉरंटशिवाय अटक करू शकतात. न्यायालयाच्या आदेशाशिवाय तपास करू शकतात. सरकार ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत आहे.

Advertisement

‘व्हाॅटसअ‍ॅप’, सिग्नल सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या युजर्सनाही आता ‘केवायसी’ (KYC) करावी लागणार आहे. नवीन टेलिकॉम बिल पुढील 6 ते 10 महिन्यांत लागू होणार असून, त्यातील तरतुदीमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास मंत्री वैष्णव यांनी व्यक्त केला.

कॉलिंगसाठी किंवा कोणत्याही संवादासाठी वापरले जाणारे सर्व अ‍ॅप्स नवीन टेलिकॉम बिलांतर्गत येतील. सरकार युजर्सचे मेसेज डिक्रिप्ट करणार नाही. मेसेज किंवा कॉल पूर्वी एवढेच सुरक्षित राहतील. मात्र, फोन कोणी केला आणि त्याची ओळख काय, हे रिसिव्हरला माहिती असायला हवे, असे ते म्हणाले.

Advertisement

 

Advertisement