SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक, ‘या’ टेलिकाॅम कंपनीची सेवा बंद होणार..? तब्बल 25 कोटी ग्राहक अडचणीत…

गेल्या काही दिवसांत टेलिकाॅम कंपन्यांमध्ये कमालीची स्पर्धा वाढलीय.. ‘प्राइस वाॅर’मुळे टेलिकाॅम कंपन्यांचा नफा तीव्र गतीने घटला. ‘रिलायन्स जिओ’ची या मार्केटमध्ये 2016 मध्ये ‘एन्ट्री’ झाल्यानंतर तर टेलिकाॅम इंडस्ट्रीचं गणितच बिघडलं. ‘जिओ’च्या फ्री ऑफरपुढे ‘एअरटेल’, ‘आयडिया’, ‘व्होडाफोन’सारख्या कंपन्या टिकू शकल्या नाहीत.

टेलिकाॅम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी ‘व्हाेडाफोन-आयडिया’ सारख्या कंपन्या एकत्र आल्या, तरी त्यांच्यासमोरील संकट कमी झाले नाही. ‘रिलायन्स जिओ’ आणि ‘एअरटेल’नंतर ‘व्होडाफोन आयडिया’ (Vodafone Idea) ही देशातील तिसरी मोठी कंपनी आहे. मात्र, सध्या ही कंपनी कर्जाच्या ओझ्याखाली प्रचंड दबलीय. दिवसेंदिवस कंपनीवरील कर्जाचा बोजा वाढतच आहे..

Advertisement

नेटवर्क बंद होणार..?

‘व्होडाफोन-आयडिया’वर ‘इंडस टॉवर्स’चं (Indus towers) जवळपास 7000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. या कर्जाची परतफेड लवकर न केल्यास, टॉवर्सचा ऍक्सेस देण्यास ‘इंडस टॉवर्स’नं नकार दिला आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबरपासून ‘व्होडाफोन आयडिया’चे नेटवर्क बंद होऊ शकतं. तसं झाल्यास देशातील या कंपनीचे तब्बल 25.5 कोटी ग्राहक अडचणीत येणार आहेत..

Advertisement

‘इंडस टॉवर्स’च्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यात कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल चर्चा झाली. या कंपनीची ‘व्होडाफोन-आयडिया’कडे सुमारे 7000 कोटी रुपयांची बाकी आहे. नोव्हेंबरपर्यंत या कर्जाची परतफेड न केल्यास, टॉवर्सचा ऍक्सेस मिळणार नसल्याचा स्पष्ट इशाराच ‘इंडस टॉवर्स’कडून देण्यात आलाय. तसे पत्र पाठवण्यात आलंय…

भारतात सध्या 5G सेवेची जोरदार तयारी सुरु आहे.. येत्या दिवाळीपर्यंत ‘एअरटेल’ (Airtel) आणि ‘रिलायन्स जिओ’ (Jio) आपली 5G सेवा लॉंच करण्याच्या तयारीत असताना, ‘व्होडाफोन आयडिया’च्या गोटात शांतता आहे. 5G सेवेसाठी आवश्यक उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या व टॉवर कंपन्यांशी करार करण्यात ‘व्होडाफोन-आयडिया’ला यश आलेलं नाही.

Advertisement

‘आधी थकित रक्कम भरा, ऍडव्हान्स द्या नि मगच करार करा..’ असं उपकरण पुरवठादार व टॉवर कंपन्यांकडून ‘व्होडाफोन आयडिया’ला सांगण्यात आलं. ‘व्होडाफोन आयडिया’कडे या कंपन्यांचे सुमारे 13000 कोटी रुपये थकले आहेत. फिनलँडची कंपनी ‘नोकिया’चे 3 हजार कोटी, तर स्वीडिश कंपनी ‘एरिक्सन’चे 1 हजार कोटीचं ‘व्होडाफोन आयडिया’वर कर्ज आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement