SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आज चांदी पुन्हा 400 रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे सोने-चांदीचे ताजे दर..

आज सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झाला नसून काल (ता. 28 सप्टेंबर) झालेल्या मोठ्या घसरणीसह दर आज स्थिर झाले आहेत. यामुळे कालच्या सोन्याच्या झालेल्या मोठ्या घसरणीचा आजदेखील ग्राहकांना मोठा फायदा मिळणार आहे. म्हणून आज ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करता येणार आहे.

चांदीच्या दराबद्दल बोलायचं झालं तर काल आणि आज अशा दोन्हीही दिवशी चांदी स्वस्त झाली आहे. जर आज तुम्हाला चांदीचे दागिने खरेदी करायचे असल्यास चांदीची किंमत (Gold-Silver Price) कमी झाल्याने तुम्हाला अगदी कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार, आज 1 किलो चांदी आज 400 रुपयांनी स्वस्त होऊन फक्त 55,000 रुपयांना मिळत आहे. तर आज (ता. 28 सप्टेंबर) जर तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर आज सकाळीच 45,800 रुपये एवढे झाले आहेत. याशिवाय 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 49,970 रुपये आहेत.

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 46,250 रुपये
▪️ मुंबई – 45,800 रुपये
▪️ दिल्ली – 45,950 रुपये
▪️ कोलकत्ता – 45,800 रुपये
▪️ बंगळुरू – 45,860 रुपये
▪️ हैदराबाद – 45,800 रुपये
▪️ पुणे – 45,830 रुपये
▪️ लखनऊ – 45,950 रुपये
▪️ नागपूर – 45,830 रुपये
▪️ नाशिक – 45,830 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 50,450 रुपये
▪️ मुंबई – 49,970 रुपये
▪️ दिल्ली – 50,130 रुपये
▪️ कोलकत्ता – 49,970 रुपये
▪️ बंगळुरू – 50,020 रुपये
▪️ हैदराबाद – 49,970 रुपये
▪️ पुणे – 50,000 रुपये
▪️ लखनऊ – 50,130 रुपये
▪️ नागपूर – 50,000 रुपये
▪️ नाशिक – 50,000 रुपये

(तुमच्या शहरांतील दर देखील कमी होण्याची शक्यता असल्याने तुमच्या शहरातील अचूक दर स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन माहीत करून घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement