SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर..!! ‘या’ योजनेला मोदी सरकारकडून पुन्हा मुदतवाढ…

कोरोना संकटात अनेकांच्या रोजीराेटीचा प्रश्न निर्माण झाल्याने मोदी सरकारने गोरगरीब जनतेसाठी मार्च-2020 मध्ये ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजना’ (PMGKAY) सुरु केली होती.. या योजनेच्या माध्यमातून देशातील जवळपास 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले जाते. त्यामुळे देशभरातील गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळाला होता..

केंद्र सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण येत असल्याने मध्यंतरी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही, तसेच गोरगरीब जनतेचा विचार करुन केंद्राने आतापर्यंत सातत्याने या योजनेला मुदतवाढ दिली. या योजनेची मुदत 30 सप्टेंबरला संपत असतानाच, मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Advertisement

योजनेला मुदतवाढ…

मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेला पुन्हा एकदा तब्बल 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला आता डिसेंबर-2022 पर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यात मोफत अन्नयोजनेला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला..

Advertisement

खरं तर सध्याची परिस्थिती पाहता, या योजनेचा मुदतवाढ मिळण्याचे संकेत आधीपासूनच मिळत होते. मोदी सरकार 30 सप्टेंबरनंतरही ही योजना पुढे चालू ठेवण्याचा विचार करीत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्याबाबत अधिकृत माहिती दिली जात नव्हती. अखेर आजच्या कॅबिनेट बैठकीत मोफत अन्न योजनेला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली.

याबाबत बोलताना केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की “सध्या देशातील सणासुदीचा मोसम लक्षात घेता, केंद्र सरकारने मोफत अन्न योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे..”

Advertisement

मोफत अन्न योजनेबाबत…

मोदी सरकारने मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली होती. या योजनेत सरकारकडून दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो मोफत रेशन दिलं जातं.. सुरुवातीला 2020-21 मध्ये केवळ एप्रिल, मे व जून 2020 अशा तीन महिन्यांसाठी ही योजना जाहीर केली होती.

Advertisement

नंतर सरकारनं जुलै ते नोव्हेंबर-2020 (टप्पा-II) पर्यंत मुदतवाढ दिली. नंतर केंद्राने एप्रिल-2021 ते मे-जून-2021 (फेज-III) आणि जुलै ते नोव्हेंबर-2021 (फेज-IV) अशी अनुक्रमे दोन आणि पाच महिने मुदतवाढ दिली.

डिसेंबर-2021 ते मार्च-2022 (टप्पा-V) पर्यंत वाढ दिली. नंतर केंद्राने 26 मार्च रोजी पुन्हा एकदा 6 महिने, म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत वाढ केली होती. आता या योजनेला सातव्यांदा 3 महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement