SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उपवासाची भगर खाताना ‘येथे’ विषबाधा, कोणती खबरदारी घ्याल, जाणून घ्या..

नवरात्र उत्सवामध्ये (Navratri 2022) भगर ही अधिक वापरली जाते. आपल्या घरातील अनेक सदस्य नवरात्रीत 9 दिवस उपवास धरत असतात. देवीवर असणाऱ्या श्रद्धेपोटी लोक उपवास धरत असतात. अशावेळी खाण्यासाठी शाबुदाणा खिचडी, चिवडा, भगर, शेंगदाणे किंवा राजगिरा लाडू खात असतो. पण हे सर्व पदार्थ कसे असतात याबद्दल आपण माहीती घ्यायला हवी, कारण हल्ली अनेक ठिकाणी विषबाधा झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

राज्यातील बीडसह (beed) औरंगाबाद ( Aurangabad) आणि जालना ( Jalna) जिल्ह्यात भगर व भगरीचे पीठ खाल्ले असता उलटी, मळमळ, चक्कर येणे आणि पोटात दुखणे या त्रासामुळे अनेक लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली असल्याने खळबळ उडाली आहे. विषबाधा (Food Poision) झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आ. याहेमुळे तुम्हीदेखील भगर खाताना काही आवश्यक काळजी घ्यायला हवी.

Advertisement

नवरात्र, गोकुळाष्टमी, रामनवमी असे काही सण-उत्सव असताना आपल्या शहरातील सार्वजनिक ठिकाणीही काही मंडळे, संस्था काही उपाहार ठेवत असतात किंवा प्रसादाच्या वेळी उपवास असलेल्यांसाठी शाबुदाणा खिचडी, भगर असे पदार्थ भक्तांना देत असतात. अशा वेळी भगर किंवा साबुदाणा पदार्थ बनवले जातात. यावेळी आवश्यक गोष्टींची काळजी घेतली जातेच असं नसतं म्हणून लोकांना विषबाधेसारखी समस्या होते. याशिवाय या वस्तू ज्या दुकानातून, मॉलमधून आपण घरी आणतो तेव्हा त्याचे पक्के बिल आणा म्हणजे खात्री पटेल की तिथे एक्सपायर असलेल्या वस्तू शक्यतो नसतील.

भगर खरेदी करताना काय काळजी घ्यावी..?

Advertisement

भगर खरेदी करताना अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार, सुटी भगर विकत न घेता पॅकिंग पाहून, मुदत पाहूनच खरेदी करा आणि बिल घ्या.

नागरिकांनी उपवास करताना भगरीची गुणवत्ता पहावी, शक्यतो भगर खाणे टाळावे.

Advertisement

जुनी किंवा बुरशी असलेली भगर खाण्यात आली की विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते, अशावेळी त्वरित डॉक्टरांकडे जावे.

भेसळयुक्त भगरही बाजारात येऊ शकते आणि जर घरी गेल्यानंतर अशी भगर खाल्ल्यावर समजलंच तर पक्के बिल पुरावा म्हणून आधीच घेऊन ठेवा म्हणजे कारवाई करणे सोपे जाईल.

Advertisement

भगर पचायला हलकी नसते. तिला पाणी जास्त लागते. स्निग्धता कमी असल्याने भरपूर तूप घालूनच भगर खावी. चांगली भाजून, भरपूर पाणी घालून, वाफेवर सावकाश शिजवावी.

भगर आमटी खाऊनही पित्त होवूच शकते. त्यामुळे आमसूल नक्की वापरावे. शिळी भगर अजिबात खाऊ नये त्यानं अपचनाचा त्रास किंवा विषबाधा होऊ शकते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement