SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘मोटू-पतलू’ देणार लोकांना ‘टॅक्स’चे धडे, केंद्र सरकारचा मोठा निर्णय…

‘कर’ हा तसा किचकट विषय.. अनेकांना त्यातील बारकावे समजत नाही. टॅक्स, रिटर्न, रिफंड, पॅन, टॅन, अशी नावं ऐकली, तरी काहींचं डोकं गरगरायला लागतं.. त्यामुळे देशातील एक मोठा वर्ग याबाबत अज्ञानी असल्याचे दिसते.. त्यातील बारकावे कळत नसल्याने अनेकांना ‘आयकर रिटर्न’ (Income tax) भरताना त्रास होतो.

मात्र, आता तुम्हीही ‘टॅक्स एक्सपर्ट’ बनू शकता, तेही अगदी हसत-खेळत..! त्यासाठी केंद्र सरकारने खास ‘कॉमिक बूक’ (Commic book) व ‘गेम’ लाँच केला आहे. चिमुकल्यांचे लाडके ‘मोटू पतलू’ (Motu-Patlu) हे प्रसिद्ध कार्टून (Cartoon) नवीन पिढीला कराबाबतचे धडे देणार आहे.. लोकांना कराबाबत माहिती देण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतलीय. #TaxLiteracyKhelKhelMein असं त्याचं नाव आहे.

Advertisement

‘मोटू पतलू’ देणार टॅक्सची माहिती

आयकर विभाग व सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांच्यातर्फे ‘डिजिटल कॉमिक बूक’ तयार करण्यात आलं आहे. त्या माध्यमातून ‘मोटू पतलू’ हे कार्टून पात्र लोकांना टॅक्सबाबतची माहिती देणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते नुकतेच त्याचे उद्घाटन करण्यात आले.

Advertisement

आयकर विभागाने हे ‘कॉमिक्स’ 5 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करुन दिलं आहे. भारताच्या कर प्रणालीतील बारकावे ‘मोटू पतलू’ लोकांना मजेशीर पद्धतीने, मात्र अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहेत. कॉमिक बुकसोबतच सरकारने बोर्ड गेमही सुरू केला आहे. हा बोर्ड गेम ‘लर्न बाय प्ले’ या थीमवर आधारित असेल.

शिवाय कराशी संबंधित ‘थ्रीडी’ कोडीही तयार केली आहेत. टॅक्समधील बऱ्या-वाईट गोष्टी समजण्यासाठी ‘साप-शिडी’ खेळाचाही त्यात समावेश केला आहे. या उपक्रमामुळे नवी पिढीमध्ये भारतीय कर प्रणालीबाबत जागरूकता वाढेल, ते देशाच्या विकासात योगदान देतील, असा दावा ‘सीबीडीटी’चे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी केला आहे..

Advertisement

दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित ‘आयकॉनिक वीक’ उत्सवाची नुकतीच सांगता झाली. त्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय सीमाशुल्क संग्रहालय आणि जीएसटी देशाला समर्पित केले. या संग्रहालयाला ‘हेरिटेज’ नाव दिलं आहे. हे लोकांना सीमाशुल्क विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement