SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना, कुठे व कधी पाहता येणार..?

भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेशी (Ind vs SA T-20 Series) भिडणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून (28 सप्टेंबर) 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. आजचा हा सामना केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघ येथे दाखल झाले आहेत. तिरुवअनंतपुरमच्या ग्रीन फिल्ड मैदानाबाहेर रोहित शर्माच्या स्वागतासाठी चाहत्यांनी भला मोठा फ्लेक्स बोर्ड लावला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आता आज कशी कामगिरी करणार, याकडे लक्ष लागले आहे. मागील ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या T-20 मालिकेमध्ये भारताच्या अक्षर पटेल वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला खास कामगिरी करता आलेली नाही. तर फलंदाजीत के.एल. राहुल, सुर्यकुमार यादव, रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक असे तगडे बॅटर असल्याने मोठी धावसंख्या उभारण्यास भारताला अडचण येणार नाही.

Advertisement

दरम्यान आजच्या संघात श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद, उमेश यादव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना आज संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होणार आहे. तुम्हाला हा सामना Disney+ Hotstar आणि Star Sports Network वर पाहता येणार आहे.

संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज अहमद.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्सिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले शॉम्सी, रिले शॉम्सी, ट्रिस्टन स्टब्स, यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन, ए. फेलुकायो.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T-20 मालिका:

Advertisement

▪️ 28 सप्टेंबर 2022 – पहिला T-20 सामना
▪️ 1 ऑक्टोबर 2022 – दुसरा T-20 सामना
▪️ 3 ऑक्टोबर 2022 – तिसरी T-20 सामना
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement