SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताने जगातील बलाढ्य देशांना टाकले मागे, ‘या’ बाबतीत एकदम सुस्साट..!!

भारत देशाने (India) अमेरिकेलाच (America) नव्हे तर जगभरातील इतर विकसीत राष्ट्रांनाही एका बाबतीत पिछाडीवर टाकलं आहे. एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की, भारताने जगातील अव्वल आणि श्रीमंत देशांना मागे टाकले आहे. यानुसार जगातील अनेक देशांना मागे टाकत भारतात सर्वाधिक पगार वाढ देण्यात येत आल्याचा आल्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

एका सर्वेक्षणानुसार, भारतात सर्वाधिक पगार वाढ दिली जात असल्याचं समजत आहे. अनेक देशांना भारताने मागे टाकून गेल्या काही काळात जास्त पगार वाढ दिली आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, चीन, जपान, जर्मनी यांसारख्या देशांना भारताने मागे टाकत एक वेगळाच ठसा उमटवला आहे. यावरून अंदाज येतो की येत्या काळामध्ये भारतातील उद्योगधंदे किती झपाट्याने वाढतील किंवा पगार वाढ किती जास्त पटीने होईल, याचा अंदाज येतो.

Advertisement

जगातील प्रोफेशनल सर्व्हिस कंपनी Aon Plc ने त्यांच्या सध्याच्या सर्वेक्षणात म्हटलंय की, भारतात 2023 मध्ये मानधनात 10.4 टक्क्यांची वाढ होऊ शकते. यंदाच्या वर्षी 2022 मध्ये आतापर्यंत 10.6 टक्क्यांची वृद्धी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सध्या 9.9 टक्क्यांची वृद्धी भारताला गाठण्यात यश मिळालं आहे.

या सर्वेक्षणासाठी देशातील 40 विविध उद्योगातील 1300 कंपन्यांच्या माहीतीनुसार हे विश्लेषण करण्यात आले आहे. 2022 मधील पहिल्या सहामाहीत नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण 20.3 टक्के राहिले. त्यामुळे वेतन वाढ करण्याशिवाय कंपन्यांपुढे दुसरा पर्याय राहिला नाही. 46 टक्के कंपन्या दुप्पट वेतनवाढ (Salary Hike) करण्याच्या तयारीत आहे. सध्या ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये 12.8, स्टार्टअप्समध्ये 12.7, आयटी, हायटेक क्षेत्रात 11.3 तर वित्तीय सेवा पुरवणाऱ्या संस्थांमध्ये 10.7 टक्के वेतन वाढीची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

म्हणून अमेरिका, ब्रिटेन, चीन, जपान, जर्मनी या देशांपेक्षा येत्या काही काळात भारतात सर्वाधिक पगार मिळणार अशी अपेक्षा लोक व्यक्त करू शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत अनेक साहसी निर्णय घेत आयात-निर्यातीत महत्वाचे निर्णय घेऊ शकतो. भारत अनेक मोठ्या मुद्द्यांवर स्वबळावर उभा राहू शकतो. याचा परिणाम इतर देशांवर होऊ शकतो, असाही दावा या सर्वेत करण्यात आला आहे. सध्या कॉर्पोरेट कंपन्यांची कामगिरी जोरदार आहे. 2023 मध्ये भारतात दोन आकडी पगार वाढ होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement