SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार..?

दसरा-दिवाळीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महागाई भत्त्याबाबत निर्णयाची वाट पाहणाऱ्या लाखो सरकारी कर्चमाऱ्यांची प्रतीक्षा अखेर आज (बुधवारी) संपली. मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे..

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता 34 ऐवजी 38 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळणार आहे. केंद्र सरकारमधील 50 लाखांहून अधिक कर्मचारी, तसेच 62 लाखांहून अधिक पेन्शनधारकांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. ‘डीए’ची ही वाढलेली रक्कम यंदाच्या जुलैपासून लागू होणार असून, मागील महिन्यांची थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

Advertisement

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ‘डीए'(DA) मध्ये 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही तिमाहींचा विचार केल्यास, ही सर्वाधिक वाढ आहे. यापूर्वी सरासरी ‘डीए’मध्ये केवळ 3 टक्के वाढ करण्यात आली होती, मात्र सततची वाढती महागाई लक्षात घेऊन मोदी सरकारने कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी उघडली आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्च-2022 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केली होती. महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 34 टक्के करण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आल्याने 34 टक्क्यांवरून महागाई भत्ता 38 टक्क्यांवर गेला आहे.

Advertisement

किती पगार वाढणार..?

एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन/पेन्शन 25 हजार रुपये असेल, तर 38 टक्के दराने महागाई भत्ता 9500 रुपये होईल. आधीच्या 34 टक्के दरानुसार, 8500 रुपये मिळत होते. म्हणजेच आता पगारात एक हजार रुपयांची वाढ होईल. 35 हजार पगार असल्यास 1400 रुपये, 45 हजार पगार असल्यास 1800 रुपये, 55 हजार पगारावर 2200 रुपये, तर 65 हजार पगार असल्यास, 2600 रुपयांची वाढ होणार आहे..

Advertisement

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) दिला जातो, तर पेन्शनधारकांना महागाई सवलत (DR) दिली जाते. ही वेतनवाढ नवरात्रोत्सवात मिळणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार, मोदी सरकारने 4 टक्क्यांची वाढ केल्याने, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दसऱ्याआधीच दिवाळी आल्याचे म्हणता येईल..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement