SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहीती, पिकांची काढणी कोणत्या यंत्राने करावी, घ्या जाणून..

भारतासारख्या कृषिप्रधान देशात अनेक पिकांच्या काढणीच्या वेळेला शेतकरी मजूरांची वाट बघत असतो. गावात मजूर न मिळाल्याने पिकांची काढणी (Crop Harvesting) तशीच काही दिवस राहून जाते. पिकांची काढणी ही वेळेत झाली ते ठीक अन्यथा बाहेर गावातून आणल्या जाणाऱ्या मजुरांच्या टोळ्या आपणही आणत असाल, पण जर ही काढणी वेळेत झाली नाही तर उत्पादनात घट (Decrease In Production) येते.

आता शेतीत विविध यंत्रे कामाला येतात. शेतीकाम करण्यासाठी अत्यंत आधुनिक अवजारे (Developed Implements) सरकारने विकसीत करून काही यंत्रे व अवजारांवर अनुदान देखील दिले आहे. शेतीमधील हीच कामे पूर्वी कामे हाताने व बैलाने केली जायची. आता सध्या शेतीची कामे मनुष्यचलित, ट्रॅक्टरचलित आणि स्वयंचलित यंत्राचा समावेश आहे. जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथे विकसीत केलेले काही यंत्र पिकांच्या काढणीस अगदी सहजपणे मदत करतात.

Advertisement

1) स्वयंचलित चारा काढणी यंत्र

▪️ हे यंत्र 5 अश्‍वशक्ती क्षमता असणाऱ्या डिझेल इंजिनवर चालते.
▪️ पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये 80 ते 90 टक्के बचत करते.

Advertisement

2) स्वयंचलित पीक कापणी यंत्र (रिपर)

▪️ 5 अश्‍वशक्ती क्षमतेच्या डिझेल इंजिनवर हे यंत्र चालते.
▪️ एका दिवसात दोन ते तीन हेक्टर क्षेत्रावरील भात व गहू पिकांची कापणी करता येते.
▪️ पारंपारिक मजुरांच्या साहाय्याने पीक कापणीपेक्षा खर्चामध्ये 80 ते 90 टक्क्यांपर्यंत बचत होते.

Advertisement

3) स्वयंचलित कंद मूळ वर्गीय पीक काढणी यंत्र

▪️ 5 अश्‍वशक्ती क्षमतेच्या डिझेल इंजिनवर चालते.
कंदमूळवर्गीय बटाटे, आले अशी पिके काढण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे.
▪️ पारंपरिक काढणी पद्धतीपेक्षा खर्चामध्ये 60 ते 70 टक्के बचत होते.

Advertisement

4) स्वयंचलित पीक कापणी व बांधणी यंत्र

▪️ हे यंत्र 12 अश्‍वशक्ती क्षमता असणाऱ्या डिझेल इंजिनवर चालते.
▪️ एका दिवसात दीड ते दोन हेक्टर शेतातील गहू किंवा भात पिकांची कापणी व निघालेल्या पेंढ्यांची बांधणी करता येते.
▪️ शेतात मजुरांच्या साहाय्याने केलेल्या कामांच्या तुलनेत खर्चामध्ये 80 ते 90 टक्क्यांपर्यंत बचत होईल.

Advertisement

5) मिनी स्वयंचलित कंबाईन हार्वेस्टर

▪️ एका दिवसामध्ये 2 ते 3 हेक्टर शेतातील गहू व भात पिकांची कापणी आणि मळणी एकाच वेळी करता येऊ शकते.
▪️ खर्चामध्ये पारंपरिक पद्धतीपेक्षा 80 ते 90 टक्के बचत होण्याची शक्यता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement