SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोने तब्बल 2,300 रुपयांनी स्वस्त, खरेदीपूर्वी वाचा आजचे ताजे दर..

आज नवरात्रीच्या मुहूर्तावर सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना सोने व चांदीचे दागिने स्वस्तात खरेदी करण्याची मोठी संधी आहे. जर आज तुम्हाला दागिने खरेदी करायचे असल्यास सोने-चांदीची किंमत (Gold-Silver Price) नेमकी किती कमी झाली हे तुम्हाला माहीत नसेल तर आज माहीत करून घ्या.

सध्याच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांनी खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. आज (ता. 27 सप्टेंबर) जर तुम्हाला सोन्याचे व चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला आज फारच कमी किंमतीत मिळणार आहेत. गुडरिटर्न्स वेबसाईटवरून मिळालेल्या माहीतीनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 200 रुपयांनी व 100 ग्रॅम सोने 2000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणून आज तुम्ही सोने-चांदी स्वस्तात खरेदी करू शकता.

Advertisement

भारतात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर आज सकाळीच 45,800 रुपये एवढे झाले आहेत. याशिवाय 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दरही आज 230 रुपयांनी कमी झाले असून 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज 49,970 रुपयांना मिळत आहे. तर चांदी किलोमागे 900 रुपयांनी घसरली असून आज 1 किलो चांदी 55,400 रुपयांना मिळत आहे.

22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 46,100 रुपये
▪️ मुंबई – 45,800 रुपये
▪️ दिल्ली – 45,950 रुपये
▪️ कोलकत्ता – 45,800 रुपये
▪️ बंगळुरू – 45,850 रुपये
▪️ हैदराबाद – 45,800 रुपये
▪️ पुणे – 45,830 रुपये
▪️ लखनऊ – 45,950 रुपये
▪️ नागपूर – 45,830 रुपये
▪️ नाशिक – 45,830 रुपये

24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:

Advertisement

▪️ चेन्नई – 50,290 रुपये
▪️ मुंबई – 49,970 रुपये
▪️ दिल्ली – 50,130 रुपये
▪️ कोलकत्ता – 49,970 रुपये
▪️ बंगळुरू – 50,020 रुपये
▪️ हैदराबाद – 49,970 रुपये
▪️ पुणे – 50,000 रुपये
▪️ लखनऊ – 50,130 रुपये
▪️ नागपूर – 50,000 रुपये
▪️ नाशिक – 50,000 रुपये

(देशभरातील वरील काही मोठ्या शहरांतील दर आणि तुमच्या शहरांतील दरात काहीसा फरक असू शकतो. अचूक दर स्थानिक ज्वेलर्सकडे जाऊन माहीत करून घ्या.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement