SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अलका कुबल, प्रिया बेर्डे अडचणीत, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय…

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीवर संकटाची मालिका सुरु आहे. विविध कारणांनी अनेक अभिनेत्यांचे चित्रपट ‘बायकाॅट’ केले जात आहेत. त्यात ‘मनी लॉन्ड्रिंग’ प्रकरणामुळे बाॅलिवूड हिरोईन जॅकलिन फर्नांडिस चर्चेत असतानाच, आता मराठमोळ्या कलाकारांवरही संक्रात कोसळल्याचं दिसतंय..

मराठीतील दिग्गज अभिनेत्री अलका कुबल व प्रिया बेर्डे यांच्यासह काही कलाकार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. एका जुन्या प्रकरणावर सुरु असलेल्या खटल्याचा निकाल लागला. त्यात न्यायालयाने या कलाकारांना लाखो रुपयांचा दंड केला आहे. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

नेमकं प्रकरण काय..?

2015 साली मराठी चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त मराठी चित्रपट महामंडळातर्फे कोल्हापूर येथे ‘मानाचा मुजरा’ हा तीन दिवसीय कार्यक्रम झाला होता.. या कार्यक्रमासाठी तेव्हा 52 लाख रुपये झाले होते. मात्र, कार्यक्रमासाठी वायफळ खर्च केला जात असून, त्यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. अहवालातही तसा उल्लेख करण्यात आला.

Advertisement

या कार्यक्रमात 10 लाख 78 हजार रुपये वाढीव खर्च झाल्याची तक्रार भास्कर जाधव, प्रमोद शिंदे, रणजित जाधव यांनी कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. त्यावेळी चित्रपट महामंडळाच्या संचालकपदी अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकर कार्यरत होते. जानेवारी 2019 मध्ये धर्मादाय सहआयुक्तांनी निर्णय देताना, या खर्चाची भरपाई करण्याचा आदेश दिला.

धर्मादाय सहआयुक्तांच्या आदेशाविरुद्ध संबंधित संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, हायकोर्टानेही कलाकारांची मागणी फेटाळून लावत ही वाढीव रक्कम 6 आठवड्यात भरण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, अलका कुबल, मिलिंद अष्टेकर, सतीश बिडकर, सुभाष भुरके, इम्तियाज बारगिर, सदानंद सूर्यवंशी यांच्यावर हा वाढीव खर्चाचा भार पडला आहे. आता ते काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement