SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): नवीन योजना राबवताना संपूर्ण खबरदारी घ्यावी. अघळ-पघळ बोलणे टाळावे. गोड बोलण्यावर भर द्यावा. जबाबदारी नेटाने पार पाडावी लागेल. आळस झटकून कामाला लागावे. सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आवडत्या कामासाठी वेळ मिळेल.

वृषभ (Taurus): भूतकाळातील गोष्टींची जाणीव जागृत ठेवाल. पोटाच्या तक्रारी जाणवतील. ज्येष्ठ बंधुचा सल्ला घ्यावा. व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. रागावर नियंत्रण ठेवावे. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. आरोग्य ठीक राहील. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. काही गोष्टींचे चिंतन आज करावे लागेल.

Advertisement

मिथुन (Gemini) : खर्च जपून करावा. आज आपल्या मनाप्रमाणे वागाल. कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात. कामे नियोजनबद्ध करावीत. जवळच्या व्यक्तीचा आधी विचार करावा. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत आनंद साजरा कराल.

कर्क (Cancer) : उत्साहवर्धक घटना घडतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील. मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. कामाचा वेग वाढेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये वरिष्ठांची सल्ला घेऊन पाउल टाका. कामाचा जास्त बोजा घेऊ नका.

Advertisement

सिंह (Leo) : दिवस मजेत जाईल. आपल्याला अपेक्षित प्रेम लाभेल. काही नवीन गोष्टी आत्मसात करू शकाल. कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाल. सुखद घटना घडू शकतात. वरिष्ठांची कौतुकाची थाप पडेल. आज क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. तरूणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील. हाती घेतलेले काम तडीस न्याल. लहान मुलांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळेल.

कन्या (Virgo) : उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. सहकार्‍यांची बाजू समजून घ्या. सावध पवित्रा घ्यावा. संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत. नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. व्यापारात जोखीम घेताना सावध राहावे. त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला घ्यावासा वाटेल. मित्राची चांगली मदत मिळेल.

Advertisement

तुळ (Libra) : संमिश्र घटनांचा दिवस. नोकरीत सहकार्‍यांकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका. मनाचा गोंधळ निर्माण होऊ शकतो. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. तुमच्यातील कौशल्याचा वापर करावा. अनोळखी व्यक्तींवर चुकुनही विश्वास ठेऊ नका. आज प्रवासात किमती ऐवज सांभाळा. सतर्क रहा. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील.

वृश्‍चिक (Scorpio) : नवीन तंत्र शिकून घ्यावे. व्यवसायात धाडस करताना सावध राहावे. मेहनतीचे महत्व लक्षात घ्यावे. भाग्यावर विसंबून राहू नका. मित्रांची नाराजी ओढवून घेऊ नका. इच्छित कार्य पूर्ण होतील. व्यावसायिक प्रकल्प वेळेवर राबविण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या व्यक्तीकडून किंवा ठिकाणाहून पैसे मिळण्याची वाट पहाल. आज केलेल्या छोट्या सहली तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

Advertisement

धनु (Sagittarius) : जवळच्या माणसांशी वाद टाळावेत. वेळ जपून वापरावा. हातातील कामात गांभीर्याने लक्ष घाला. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. उगाच चिडचिड करू नका. नोकरी शोधणाऱ्यांना आज चांगले परिणाम मिळतील. वडिलांच्या मदतीने काही व्यावसायिक प्रकरणे हुशारीने सोडवता येतील. टीकेकडे दुर्लक्ष करावे. भावनाप्रधान होऊ नका. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

मकर (Capricorn) : वादाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराकडून अपेक्षित साथ मिळेल. थोडेफार मनाचेही ऐकावे. हाती घेतलेल्या कामात निष्काळजीपणा करू नका. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक जीवन सुखकर होईल. वेळ आनंदपूर्वक व्यतीत होईल. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मित्रांचा पाठिंबा मिळेल. नोकरीच्या क्षेत्रातील तुमच्या अडचणी दूर होतील.

Advertisement

कुंभ (Aquarious) : व्यवसायिकांना नवीन संधी चालून येतील. आर्थिक स्थिती सुधारता येईल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील. नवीन ओळखी जनसंपर्कात भर टाकतील. काही परिवर्तन घडून येईल. भावनात्मकतेमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. स्वाक्षरी करण्यापूर्वी कागदपत्रे वाचून घ्या. वैचारिक गुंतागुंत टाळावी. जमिनीच्या कामात लाभ संभवतो.

मीन (Pisces) : व्यावसायिक अडचणींवर कौशल्याने मात कराल. चिंतामुक्त व्हाल. हाती घेतलेली कामे नियोजनाने पूर्ण कराल. नवीन संधी उपलब्ध होईल. कामाची दगदग जाणवेल. आज तुमच्या व्यवसायात सुधारणा होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. व्यवसायात सुधारणा होण्याची शक्यता आहे. आज काही महत्त्वाची माहिती मिळाल्याने मन प्रसन्न राहील. घराची जुनी कामे निघू शकतात.

Advertisement