SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात बदल, ‘या’ खेळाडूंना विश्रांती..

कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी (ता. 25) तिसरा व निर्णायक सामना जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांच्या तुफान फटकेबाजीमुळे टीम इंडियाने 6 विकेट्स राखून हा सामना जिंकताना मालिकाही खिशात घातली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर लगेच दुसऱ्या मालिकेसाठी मैदानावर उतरावे लागणार आहे. येत्या 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका होत आहे. आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून ‘बीसीसीआय’ने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध मालिकेचे आयोजन केले आहे.

Advertisement

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकली असली, तरी या मालिकेत भारतीय संघाची गोलंदाजी अगदीच सुमार होती. फिरकी गोलंदाज अक्षर पटेल वगळता, अन्य गोलंदाज आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. सर्वात अनुभवी भुवनेश्वर कुमार तर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. पुनरागमन करणारे हर्षल पटेल व जसप्रीत बुमराह यांचाही करिश्मा दिसला नाही.

पांड्या, भुवीला विश्रांती

Advertisement

भारतीय संघासाठी दिलासादायक बाब म्हणेज, विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव हे फलंदाज फॉर्मात आले आहेत. हार्दिक पांड्या महत्वपूर्ण योगदान देताेय. रवींद्र जाडेजाच्या दुखापतीमुळे संघात आलेल्या अक्षरने त्याची जागा पक्की केलीय. विकेटकिपर रिषभ पंतपेक्षा रोहितने अनुभवी दिनेश कार्तिकवरच भरवसा दाखवल्याचे दिसले.

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघाला आणखी सरावाची संधी मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ 28 तारखेपासून मैदानात उतरणार आहे. मात्र, या मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघातून हार्दिक पांड्या व भुवनेश्वर कुमार यांना वगळण्यात आले आहे.

Advertisement

अर्शदीप सिंग व दीपक हुडा यांचे पुनरागमन होणार असल्याचे समजते. मात्र, दीपक हुडाचीही पाठदुखी बळावल्याने तो या मालिकेला मुकू शकतो. तसे झाल्यास दीपक चहरला संधी मिळण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्याच्या फीटनेसबाबत अजून अपडेट्स आलेले नाहीत.

भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,  दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

Advertisement

दक्षिण आफ्रिका संघ – टेम्बा बवुमा ( कर्णधार), क्विंटन डी कॉक, बीजॉर्न फॉर्च्युन, रिझा हेंड्रिक्स, मार्को येनसेन, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, रिली रोसोवू, तब्रेझ शम्सी, त्रिस्तान स्टब्स.

वेळापत्रक (सर्व सामने सायंकाळी ७ वाजेपासून) 

Advertisement
  • पहिला सामना – 28 सप्टेंबर, तिरुअनंतपूरम
  • दुसरा सामना – 2 ऑक्टोबर, गुवाहाटी
  • तिसरा सामना – 4 ऑक्टोबर,  इंदूर
  • थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्ट्स व हॉट स्टार

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement