SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ऑनलाईन फ्राॅड रोखण्यासाठी ‘गुगल’ची खास मोहीम, ग्राहकांचा होणार फायदा..!!

हातात स्मार्टफोन आल्यापासून अनेक जण ऑनलाईन व्यवहाराकडे वळले. सरकारही डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत असल्याने कॅश व्यवहाराचे प्रमाण कमी झालं. मात्र, युजर्स स्मार्ट होताना, चोरही हायटेक झाले.. सायबर चोरीचा नवा प्रकार समोर आला. अगदी काही कळण्याआधीच खात्यातून रक्कम गायब होऊ लागली..

गेल्या काही दिवसांत ऑनलाईन, डिजिटल बॅंकिंगमध्ये फ्रॉडचं प्रमाण प्रचंड वाढलंय.. त्यात ऑनलाई कर्ज देणारे अ‍ॅप्स व त्यांच्या वसूली एजंटची भर पडली. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. ही बाब लक्षात आल्यावर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने अशा अ‍ॅप्स विरोधात कडक पावले उचलली आहेत.

Advertisement

‘रहो दो कदम आगे’…

‘आरबीआय’च्या निर्णयानंतर जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन ‘गुगल’नेही अशा फ्राॅड अ‍ॅप्स (Fraud apps) विरोधात एक मोहीम हाती घेतली आहे. ‘रहो दो कदम आगे’ (Raho Do Kadam Aagey) असं या मोहिमंच नाव आहे. अ‍ॅप्सद्वारे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांना रोखण्यासाठी ‘गुगल’ने (Google) ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे..

Advertisement

Advertisement

‘गुगल’च्या या मोहीमेमुळे बोगस व बनावट कंपन्यांना आळा बसणार आहे. त्या माध्यमातून ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अ‍ॅप्सना ग्राहकांबरोबर मनमानी करता येणार नाही. कारण, आता त्यांच्यावर कायद्याची करडी नजर असणार आहे.

‘गुगल’ची नियमावली..

Advertisement
  • ‘गुगल’ने प्ले स्टोअरवरील कर्जपुरवठा करणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सला तंबी दिली आहे. आता या अ‍ॅप्सना कर्ज प्रकरणाचा लेखाजोखा समोर ठेवावा लागेल. त्यात लपवाछपवी करता येणार नाही.
  • आतापर्यंत हे कर्ज अ‍ॅप्स कोणाकडून कर्जपुरवठा करतात, याची माहिती ग्राहकांना दिली जात नव्हती. मात्र, आता यापुढे त्यांना तसं करता येणार नाही.  कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या वित्तीय संस्था अथवा बँकांचीही माहिती त्यांना ग्राहकांना द्यावी लागेल.

वित्तीय संस्था अथवा बँकांकडून हे अ‍ॅप्स स्वस्तात कर्ज मिळवतात व इन्स्टंट लोनच्या नावाखाली ग्राहकांना जादा व्याजदराने देतात. त्यानंतर व्याज वसुलीसाठीही ग्राहकांकडे तगादा लावत होते. ग्राहकांची ही आर्थिक पिळवणूक समोर आल्यानंतर ‘गुगल’कडून ही पावले उचलण्यात आली आहेत.

गुगलकडून अशा अ‍ॅप्सना वित्तीय सेवांसंदर्भात माहिती देण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत डेडलाईन दिली होती. ‘गुगल’च्या दिशानिर्देशानुसार आतापर्यंत बदल न करणाऱ्या अ‍ॅप्सना त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. गुगलच्या नियमानुसार, बदल न केल्यास असे अ‍ॅप्स ‘प्ले स्टोअर’वरुन हटवण्यात येणार असल्याचा इशारा ‘गुगल’कडून देण्यात आला आहे..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement