SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

1 ऑक्टाेबरपासून होणार ‘हे’ बदल, सणासुदीला वाढणार खिशावरील बोजा..!!

सप्टेंबर महिना संपण्यास अवघे काही दिवस राहिले असून, लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. खरं तर ऑक्टाेबर हा सणासुदीचा महिना.. दसरा-दिवाळीसारखे सर्वात मोठे सण या महिन्यातच येतात. मात्र, या नवीन महिन्यात तुमच्या खिशावरील भार वाढण्याची शक्यता आहे.

दर महिन्याच्या 1 तारखेला आर्थिक क्षेत्राशी निगडीत बाबींमध्ये मोठे बदल होतात. नियम बदलतात.. त्यामुळे नाही म्हटलं, तरी नागरिकांचं अर्थकारण बिघडतेच.. 1 ऑक्टोबरपासून नेमके कोणते बदल होणार आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘हे’ बदल होणार..

आयकर दात्यांना दणका

Advertisement

आयकर दात्यांना 1 ऑक्टोबरपासून केंद्र सरकारच्या ‘अटल पेन्शन योजने’चा लाभ घेता येणार नाही. सध्याच्या नियमानुसार, 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणालाही या पेन्शन योजनेत सहभागी होता येत होते. या योजनेंतर्गत दरमहा 5000 रुपयांपर्यंत पेन्शन दिली जाते.

टोकनायझेशन प्रणाली

Advertisement

ऑनलाइन बँकिंगमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून टोकन प्रणाली लागू केली जाणार आहे. डेबिट/क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी टोकनायझेशन प्रणाली आणली आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर, व्यापारी, पेमेंट एग्रीगेटर, पेमेंट गेटवे आदींना यापुढे ग्राहकांच्या कार्डची माहिती ‘सेव्ह’ करता येणार नाही.

म्युच्युअल फंडासाठी नॉमिनेशन

Advertisement

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना, आता नामांकन तपशील द्यावा लागणार आहे. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (AMCs) गुंतवणूकदाराच्या आवश्यकतेनुसार नामनिर्देशन फॉर्म किंवा घोषणा फॉर्मचा पर्याय भौतिक किंवा ऑनलाइन मोडमध्ये प्रदान करावा लागेल.

डीमॅट नियमांत बदल

Advertisement

डीमॅट खातेधारकांना 30 सप्टेंबर 2022 पर्यंत द्वि-घटक प्रमाणीकरण करावे लागेल. त्यानंतरच डिमॅट खात्यात ‘लॉग इन’ करू शकाल. डीमॅट खात्यात ‘लॉग इन’ करण्यासाठी प्रमाणीकरण घटक म्हणून बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरावे लागेल.

रेपो दरात वाढ

Advertisement

देशातील बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, अशा लहान बचत योजनांमध्ये व्याजदर वाढू शकतात. पोस्टाच्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदर 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर होऊ शकतात.

गॅस स्वस्त होणार..?

Advertisement

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती दर महिन्याच्या 1 तारखेला बदलतात. कच्चे तेल व नैसर्गिक वायूच्या किमती नरमल्यामुळे घरगुती (14.2 किलो) व व्यावसायिक (19 किलो) गॅस सिलिंडरच्या किमती या महिन्यात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement