SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार, माॅन्सूनच्या परतीला ‘या’ दिवसापासून सुरुवात..

राज्यात जूनच्या सुरुवातीला पावसाने हात आखडता घेतला होता. मात्र, त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसानं अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. या महिन्यातही (सप्टेंबर) राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 24 टक्के अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली.

यंदा राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. पिकांचं मोठं नुकसान झालं. उभी पिकं वाया गेली. जमिनी खरवडून निघाल्या. नदी-नाले ओसंडून वाहिले. धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाल्याची हवामान विभागाची माहिती आहे..

Advertisement

पावसाचा जोर पुन्हा वाढणार

राज्यात सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसत आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला असला, तरी अन्य ठिकाणी पावसानं उघडीप दिलीय. मात्र, आता सावध व्हा.. कारण, 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान विदर्भासह राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Advertisement

कोकणातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचे सांगितलं जात आहे.

या जिल्ह्यांना इशारा

Advertisement
  • 26 सप्टेंबर – मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर
  • 27 सप्टेंबर – नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद आणि लातूर, उत्तर महाराष्ट्रात जळगाव व अहमदनगर
  • 28 सप्टेंबर – औरंगाबाद, जालना, बीड आणि लातुर.

महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा पाऊस लवकरच परतीच्या प्रवासाला निघणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातून 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान माॅन्सून माघारी फिरणार आहे. तसेच, 8 ऑक्टोबरला मुंबईतून माॅन्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement