SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धोनीच्या फेसबूक पोस्टमुळे सस्पेन्स वाढला, अखेर समोर आलं वेगळंच काहीतरी…

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावर शनिवारी (ता. 24) एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने रविवारी दुपारी 2 वाजता पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी आता ‘आयपीएल’मधूनही विश्रांती घेणार असल्याचे बोलले जात होते.

पत्रकार परिषदेत धोनी नेमकी काेणती घोषणा करतो, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. साऱ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीही झालं नाही. धोनीने लाईव्ह येत 2011 साली लॉन्च केलेल्या एका प्रॉडक्टचं रि-लॉन्चिंग केलं, पण हे करीत असताना, त्यामागील कारणही सांगितलं.

Advertisement

धोनीने काय घोषणा केली..?

महेंद्रसिंग धोनीने आज ‘ओरिओ’ या कूकीजचं रिलॉन्चिंग केलं. भारतात 2011 सालीच या कंपनीनं आपलं प्रॉडक्ट बाजारात आणलं होतं. त्यानंतर आता धोनीने पुन्हा एकदा ‘ओरियो’चे रिलॉन्चिंग केलं. पण हे करीत असताना, त्याने एक मजेशीर कारणही दिलं.

Advertisement

तो म्हणाला, की भारतात 2011 साली ओरिओ कूकीज लॉन्च झाली होती आणि त्याच वर्षी भारतानं ‘वर्ल्ड कप’ जिंकला होता. आता आपण पुन्हा एकदा हे कूकीज रिलॉन्च करीत असून, यंदाही आपण पुन्हा एकदा ‘टी-20 वर्ल्ड कप’ खेळणार आहोत. त्यामुळे या मागचं कनेक्शन समजून घ्या, असे धोनीने सांगितले..

Advertisement

खरं तर इतर सेलिब्रेटिंप्रमाणे धोनी हा सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसतो, पण ‘फेसबुक’वर त्याने शनिवारी एक पोस्ट शेअर केली नि एकच खळबळ उडाली. आपल्या क्रिकेट कारकीर्दीबाबतच तो काही तरी मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, प्रत्यक्ष धोनीनं एका प्रॉडक्टचं रिलॉन्चिंग करत असल्याचं जाहीर केल्यावर अनेकांचा जिव भांड्यात पडला..

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, त्यासाठीही त्याने पत्रकार परिषद घेतलेली नव्हती. असं असलं, तरी अजूनही तो फ्रँचायझी क्रिकेट खेळत आहे. ‘आयपीएल’च्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक ‘चेन्नई सुपर किंग्स’चा तो कर्णधार आहे. कदाचित यंदा तो ‘आयपीएल’लाही राम राम करण्याची शक्यता आहे..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement