SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ग्राहकांना फटका..!! मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे सोने-चांदी महागणार…

दसरा-दिवाळी सण तोंडावर आलेले असताना, बाजारात खरेदीचा उत्साह दिसत आहे. या दिवसात सोन्या-चांदीची मोठी खरेदी होत असते. मात्र, ग्राहकांच्या खरेदीच्या आनंदावर लवकरच विरजण पडण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे आगामी काळात सोने-चांदीच्या किंमती महागणार असल्याचे बोलले जात आहे..

केंद्र सरकारने नोव्हेंबर-2019 मध्ये सोन्यांच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असणं आवश्यक असल्याची घोषणा केली होती. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार देशभरातील सराफांनी आभुषणे व दागिन्यांवर हॉलमार्किंग करावे, असा आदेश देण्यात आला..

Advertisement

देशात 15 जानेवारी 2021 रोजीपासून दागिन्यांवरील हाॅलमार्किंगचा निर्णय अनिवार्य करण्यात आला आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगसाठी शुल्क आकारले जाते. त्याची गणना मान्यताप्राप्त तुकड्यांच्या वजनानुसार केली जाते. दागिने व आभुषणाच्या वजनानुसार शुल्काची गणना होत नाही.

हॉलमार्किंगच्या शुल्कात वाढ

Advertisement

मोदी सरकारने आता सोने-चांदीच्या हॉलमार्किंगच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत भारतीय मानक ब्यूरो अर्थात ‘बीआयएस’कडून (BIS) एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, सोन्याच्या दागिन्यांसाठी आता हॉलमार्किंग शुल्क 35 ते 45 रुपये झाले आहेत. त्यामुळे दागिने घडवण्यासाठी जादा रक्कम मोजावी लागणार आहे.

तसेच, चांदीचे आभूषणे व दागिन्यांवर हॉलमार्किंगसाठी 25 ते 35 रुपये प्रति दागिना चार्ज द्यावा लागणार आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या दागिन्यांवर ग्राहकांना आता जादा शुल्क मोजावे लागणार आहे. ऐन सणासुदीत ही दरवाढ झाल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. हॉलमार्किंगचा नियम 2018 मध्येच जाहीर झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच हॉलमार्किंग शुल्कात वाढ झालीय.

Advertisement

दरम्यान, हॉलमार्किंग केलेल्या दागिन्यांवर ‘बीआयएस’ लोगो, शुद्धतेचा ग्रेड व 6 अंकी ‘अल्फान्यूमेरिक कोड’ असतो. त्याला ‘HUID’ असं म्हणतात. सोने वितळवून त्यापासून भारतीय मानक आईएस 1417:2016 नुसार, ग्रेड 14, 18 वा 22 कॅरेटचे दागिने तयार केले जातात. आता त्यावर हाॅलमार्किंग असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे..

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement