SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य सरकार ‘या’ परीक्षा पुन्हा सुरु करणार…

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात 10 वर्षांपासून बंद असलेल्या तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

महाराष्ट्रात शिक्षण हक्क कायदा (आरटीई) लागू झाल्यापासून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित सातत्यपूर्ण सर्वंकष पद्धतीने मूल्यमापन केले जात होते. या विद्यार्थ्यांना नापास न करता थेट पुढच्या वर्गात प्रवेश दिला जात होता. मात्र, आता पुन्हा एकदा तिसरी ते आठवीच्या परीक्षा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

एकशिक्षकी शाळांचे एकत्रीकरण

मंत्री केसरकर म्हणाले, की “आठवीपर्यंत मुलांना परीक्षा नसल्याने अभ्यासात मागे पडत आहेत. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशात 9 व्या क्रमांकावर आहे. आपल्या राज्याला पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चांगल्या पद्धतीने राबविण्याचा विचार आहे.”

Advertisement

ते म्हणाले, की “एकशिक्षकी व शून्य शिक्षकी शाळांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. अधिवेशनापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविले जातील व त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. एकाच शिक्षकाने सारे विषय शिकवताना त्यावर मर्यादा येतात. यासाठी धोरण निश्चित करण्याचे काम सुरू आहे.”

शालेय मुलांचा गृहपाठ बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये, यासाठी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल. दुर्गम भागात, जेथे वाहन जात नाही, अशा शाळांची माहिती घेतली जाईल. सर्वांना शिक्षण मिळावे, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे केसरकर यांनी सांगितले..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement