SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कमी भांडवलात सुरु करा ‘हा’ बिझनेस, दरमहा होईल 5 लाखांहून अधिक कमाई….!!

कोरोना संकटात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. त्यानंतर आता सारे काही सुरळीत झाले असले, तरी आता अनेक जण नोकरीऐवजी स्वत:चा बिझनेस करण्याकडे वळू लागले आहेत. कमी भांडवलात करता येण्यासारखे अनेक उद्योग-धंदे असून, त्याद्वारे चांगली कमाईही होत असल्याचे दिसते..

तुम्हालाही स्वत:चा बिझनेस असावा असं वाटत असेल, तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. सध्या ऑनलाइन शॉपिंगचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. ऑनलाइन वस्तू विकायची झाली, तर पॅकिंगसाठी लागते, कार्टन…! याआधीही पॅकिंगसाठी कार्टनचा (पुठ्ठे) वापर केला जात होता, मात्र प्लास्टिक बंदीनंतर त्याच्या मागणीत खूपच वाढ झाली आहे..

Advertisement

कार्टन व्यवसायाबाबत…

मोबाईलपासून टीव्हीपर्यंत, चपलांपासून काचेच्या वस्तू असो वा किराणा सामान.. ऑनलाईन शाॅपिंग व्यवसायात या वस्तूंच्या पॅकिंगसाठी पुठ्ठ्याच्या बॉक्सचा वापर करावाच लागतो. प्लॅस्टिकबंदीपासूनच तर पुठ्ठ्याचे बॉक्सला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे कार्टनच्या व्यवसायात नक्की यश मिळू शकते..

Advertisement

सध्या बर्‍याच कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या वितरणासाठी विशेष प्रकारचे कार्टन बॉक्स वापरतात. कार्टनच्या व्यवसायात प्रवेश करण्याआधी या उत्पादनाबाबत सगळी माहिती असायला हवी. त्यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग’मधून कोर्स करूनही हा व्यवसाय सुरू करू शकता.

पुठ्ठ्याचे कार्टन्स बनवण्यासाठी प्रामुख्याने क्राफ्ट पेपरचा वापर केला जातो. दर्जेदार कार्टन्स बनवण्यासाठी चांगले ‘क्राफ्ट पेपर’ वापरा. सोबत पिवळा स्ट्रॉ-बोर्ड, गोंद व शिवणाची तार लागेल. सिंगल फेस पेपर कॉरुगेशन मशीन, रील स्टँड लाइट मॉडेलसह बोर्ड कटर, शीट पेस्टिंग मशीन, शीट प्रेसिंग मशीन, इसेन्ट्रिक स्लॉट अशा मशीन घ्याव्या लागतील.

Advertisement

किती खर्च येईल..?

कार्टनच्या व्यवसायासाठी सुमारे 5,500 चौरस फूट जागा लागेल. सेमी ऑटोमॅटिक मशिनच्या साहाय्याने मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सुमारे 20 लाख रुपये खर्च येईल. पूर्णपणे स्वयंचलित मशीन खरेदी करायचे असेल, सुमारे 50 लाख रुपये गुंतवावे लागतील. ‘मुद्रा’ योजनेंतर्गत तुम्ही सरकारी बँकांकडून सुलभ व्याजदरावर कर्जदेखील मिळवू शकता.

Advertisement

कमाई किती होणार..?

सेटअप पूर्ण झाल्यावर जवळच्या पॅकेजिंग एजन्सीशी संपर्क साधून तुमच्या बॉक्सचे नमुने दाखवा. त्यांच्या ऑर्डरनुसार, तुम्ही कार्टन बनवू शकता.. आगामी काळात पुठ्ठ्याचे कार्टन्सला मागणी वाढणार आहे. तुमच्या उत्पादनासाठी उत्तम पुरवठा साखळी तयार केल्यास, दरमहा 4 ते 6 लाख रुपये सहज कमावू शकता. ग्राहकांची संख्या वाढेल, तशी कमाईत वाढ होत जाईल..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement