SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी, ‘एसबीआय’मध्ये 1673 जागांसाठी भरती…!!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही पदांसाठी बंपर मेगाभरती होत आहे. याविषयीची अधिसूचनाही बँकेकडून जारी करण्यात आली आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (SBI PO Recruitment- 2022)

एकूण जागा – 1673

Advertisement

पुढील पदासाठी भरती – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

शैक्षणिक पात्रता

Advertisement

उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक, पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे उमेदवारही अर्ज करु शकतात. मुलाखतीवेळी 31 डिसेंबर 2022 पूर्वी पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेले असावे. तसा पुरावा सादर करावा लागेल.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2022 रोजीपर्यंत 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. वयातील सवलत सरकारच्या नियमानुसार लागू आहे.

Advertisement

अर्ज शुल्क

  • सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी – 750 रुपये
  • एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी उमेदवारांना शुल्क नाही.

दरमहा पगार

Advertisement

ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल- I लागू असेल. 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 वेतन स्केल असेल.
सुरुवातीचे बेसिक वेतन 41,960/- (4 अग्रिम वेतन वृद्धि सह) असेल. तसेच इतर अनुषांगिक लाभ व भत्ते मिळतील.

महत्वाच्या तारखा

Advertisement

– ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया – 22 सप्टेंबरपासून सुरु
– अर्ज करण्याची अंतिम तारीख- 12 ऑक्टोबर 2022
– अर्जात दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख- 12 ऑक्टोबर 2022
– अर्जाची प्रिंटआउट काढण्याची अंतिम तारीख- 27 ऑक्टोबर 2022
– ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख – 22 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2022

सविस्तर माहिती व अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement