SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेशन कार्डधारकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, मोफत अन्न योजनेत होणार महत्वाचा बदल…

रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी आहे.. कोरोना संकटात अनेकांच्या रोजीराेटीचा प्रश्न निर्माण झाल्याने मोदी सरकारने गोरगरीब जनतेसाठी ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजना’ (PMGKAY) सुरु केली होती.. स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचे वाटप सुरु करण्यात आले..

सध्या देशातील जवळपास 80 कोटी लोकांना ‘पीएम गरीब कल्याण अन्न योजने’मार्फत मोफत धान्य दिले जाते. त्यामुळे देशभरातील गोरगरीब लोकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी मोदी सरकार आता या मोफत अन्नयोजनेत मोठा बदल करण्याच्या विचारात असल्याचे समजते..

Advertisement

कोरोना काळात मार्च-2020 मध्ये ही योजना सुरु करण्यात आली होती. सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याने मध्यंतरी ही योजना बंद केली जाणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, आतापर्यंत सातत्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. सध्या फ्री रेशन योजनेची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे. मात्र, या योजनेला आणखी 3 ते 6 महिने मुदतवाढ दिली जाणार असल्याचे समजते.

रेशन नव्हे, पैसे मिळणार…?

Advertisement

पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजना सुरु राहणार असली, तरी आता त्यात बदल केले जाणार आहेत. आगामी काळात मोफत अन्न-धान्याऐवजी लाभार्थींच्या खात्यावर थेट ‘डीबीटी’ (DBT)च्या माध्यमातून पैसे जमा करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. अर्थात, ‘रेशन की पैसे’ याची निवड करण्याची मुभा लाभार्थांना असणार आहे.

कोरोना काळापासून देशातील गरजू लोकांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत मोफत अन्नधान्याचे वाटप केले जात होते. मात्र, आता मोदी सरकार फ्री धान्य देण्याऐवजी लाभार्थ्यांना पैसे देण्याच्या विचारात आहे. ‘डीबीटी’द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे ‘ट्रान्सफर’ केले जाणार आहेत. सध्या या प्रस्तावावर चर्चा सुरू असून, पुढील आर्थिक वर्षात हे बदल होऊ शकतात.

Advertisement

अपात्र लोकांना वगळणार..

गेल्या काही दिवसांत अनेक अपात्र लाेकही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सध्याची 80 कोटी लाभार्थ्यांची यादी ‘फिल्टर’ केली जाणार आहे. त्यासाठी आता अनेक मापदंड लागू होणार असून, आता या यादीतील अनेक नावे कमी होऊ शकतात. ज्यांना फ्री रेशनची गरज नाही, अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना लिस्टमधून काढलं जात आहे.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement