SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हिरो’कडून तीन नवीन ई-सायकल लाॅंच; आकर्षक फीचर्स नि शानदार लूक्स..

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ होत असल्याने, ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहून वाहन निर्मात्या कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करु लागल्या आहेत. त्यानंतर आता इलेक्ट्रिक सायकलही (Electric Bicycles) बाजारात दिसू लागल्या आहेत..

भारतातील दिग्गज ऑटो कंपन्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या ‘हिरो’ कंपनीच्या सायकलला नेहमीच ग्राहकांची पसंती राहिलीय. ही बाब ओळखून ‘हिरो’च्या ई-सायकल ब्रँड ‘हिरो लेक्ट्रो’ने (Hero Lectro) तीन नवीन ई-सायकल बाजारात सादर केल्या आहेत. आपली ‘सी’ आणि ‘एफ’ सिरीज पुढे नेताना, ‘हिरो’ कंपनीने C1, C5x आणि F1 नावाने तीन ई-सायकल लाँच केल्या आहेत.

Advertisement

‘हिरो’च्या ई-सायकलबाबत…

हिरो कंपनीने शहरात, तसेच ग्रामीण भागातील रोडवरही सर्वोत्तम अनुभव मिळेल, अशा प्रकारे नवीन इलेक्ट्रिक सायकल डिझाइन केली आहे. या सायकलमध्ये अॅल्युमिनियम 6061 ‘अलॉय व्हील फ्रेम्स’ दिल्या असून, त्यामुळे या सायकल खूप शक्तिशाली बनतात. अन्य फीचर्स खालीलप्रमाणे :

Advertisement
  • हिरो लेक्ट्रो इलेक्ट्रिक सायकल 30 किलोमीटरपर्यंत रेंज मिळते. एका चार्जवर ही सायकल 25 ते 30 किलोमीटर चालते.
  • ई-सायकलमध्ये महत्वपूर्ण बदल केले असून, त्यामुळे ‘सी-1’ मॉडेलला उत्तम अर्गोनॉमिक्स मिळते.
  • तिन्ही सायकल अँटी-स्किड अलॉय पेडल्स, एरोडायनॅमिक फोर्क्स आणि IP67 आणि IP65 डस्ट व वॉटरप्रूफ रेटिंगसह येतात.
  • नवीन हिरो लेक्ट्रो C1, C5X आणि F1 सायकल RFID की लॉकिंग, LED डिस्प्ले, ड्युअल वॉल अलॉय व्हीलसह येतात.
  • सायकलमध्ये 250W BLDC रियर हब मोटर्स आणि हाय पॉवर Li-ion बॅटरी वापरली आहे.
  • नवीन ई-सायकलला नेहमीच्या पॉवर सॉकेटसह एक सुसंगत पोर्टेबल चार्जर मिळतो, परंतु C5x मॉडेल वेगळे करण्यायोग्य Li-ion बॅटरीसह येते. त्यामुळे सायकल चार्ज करणे, बॅटरी स्वॅप करणे नेहमीपेक्षा सोपे होते.

ई-सायकलची किंमत…

‘हिरो लेक्ट्रो’च्या तिन्ही सायकल्स 32,999 रुपये ते 38,999 रुपये किंमतीच्या रेंजमध्ये सादर केल्या आहेत. ग्राहकांना या ई-सायकल्स 600 हून अधिक डीलर्ससह ‘हिरो लेक्ट्रो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म’वरून खरेदी करता येतील. सोबतच दिल्ली, कलकत्ता व चेन्नई येथील खास अनुभव केंद्रांवरूनही या सायकल खरेदी करता येणार आहेत.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement