SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सणासुदीला सोनं महागलं… चांदीचे दर स्थिर, आजचे बाजारभाव जाणून घ्या..

भारतीयांना नेहमीच सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण राहिलंय.. त्यामुळेच नागरिकांचा, विशेषत: महिलांचा दागिने खरेदीचा उत्साह मोठा असतो. मागणीत होणाऱ्या चढ-उताराचे परिणाम सोन्याच्या किमतीवरही पाहायला मिळतात. सध्या दसरा-दिवाळी तोंडावर आल्याने सोन्याची मागणी वाढल्याचे दिसत आहे..

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात अस्थिरता दिसत आहे. भारतीय सराफ बाजारात गुरुवारी (ता. 22) सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर आज (ता. 23) पुन्हा एकदा सोन्याचे दरात तेजी दिसून आली.. 22 कॅरेट सोन्याचा दर 46,010 रुपये प्रति तोळा, तर 24 कॅरेट सोन्यासाठी 50,210 रुपये प्रति तोळा भाव आहे..

Advertisement

दरम्यान, सराफ बाजारात चांदीच्या दर स्थिर असल्याचे दिसत आहे. एक किलो चांदीची किंमत शुक्रवारी (ता. 23) 58,000 रुपये होती. गुरुवारच्या तुलनेत त्यात कोणताही बदल झाला नसल्याचे दिसत आहे.

प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति तोळा)

Advertisement
  • चेन्नई – 50,010 रुपये
  • दिल्ली – 50,360 रुपये
  • हैदराबाद – 50,210 रुपये
  • कलकत्ता – 50,210 रुपये
  • लखनऊ – 50,360 रुपये
  • मुंबई – 50,210 रुपये
  • नागपूर – 52,240 रुपये
  • पुणे – 52,240 रुपये

नवरात्रीआधी सोन्याचे दर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरताना दिसत असून, पुन्हा एकदा सोन्याला झळाळी येताना दिसत आहे.. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमती वाढल्या असून, त्याचा परिणाम भारतीय सराफ बाजारात पाहायला मिळत आहे..

दरम्यान, आता तुम्हाला अगदी घरबसल्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेता येणार आहे. त्यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल करू शकता. काही वेळानंतर तुम्हाला ‘एसएमएस’द्वारे सोन्याचे नवीन दर मिळतील. याशिवाय तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या वेबसाइटवरही नवीन दर तपासू शकता.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement