SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ही’ कंपनी करणार 9000 कर्मचाऱ्यांची भरती, ‘वर्क फ्राॅम होम’ करता येणार…!!

कोरोना महामारीमुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. वेतनावरही परिणाम झाला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ ही नवी संकल्पना समोर आली. सुरुवातील अनेक कंपन्यांनी याबाबत नाक मुरडले असले, तरी आता ही कल्पना जनमानसात चांगलीच रुजल्याचे दिसत आहे..

कोरोना काळात नोकरीवर पाणी सोडावे लागलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. एका मल्टिनॅशनल कंपनीने भारतात तब्बल 9000 जागांसाठी मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, नोकर भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

Advertisement

कुठूनही काम करता येणार..

‘ग्लोबल कस्टमर सर्व्हिस सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस’ असे या मल्टीनॅशनल कंपनीचं नाव आहे. या कंपनीने (Global Customer Service software And Services) भारतात 2022-23 या आर्थिक वर्षात 9000 उमेदवारांची भरती करण्याची घोषणा नुकतीच केली. देशाच्या विविध भागातून ही कंपनी आगामी काळात कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.

Advertisement

फोन व चॅटच्या माध्यमातून कंपनी या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहकांना सुविधा पुरवण्याचं काम भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. याबाबत कंपनीच्या भारत व अमेरिका क्षेत्राच्या वरिष्ठ उपाध्यक्ष नीना नायर यांनी माहिती दिली..

त्या म्हणाल्या, की “भारतात खूप चांगली व संघटित टॅलेंटची साखळी आहे. त्यामुळे भारत या क्षेत्रात अग्रेसर आहे. कंपनीद्वारे नवीन तरुणांची भरती केली जाते. त्यांच्यातली कौशल्यं विकसित केली जातात, त्यातूनच नवे लीडर्स उदयाला येतात. कंपनीनं मागील वर्षी 5000 तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली होती.”

Advertisement

निवड झालेल्या या कर्मचाऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्टिकल एक्स्पर्टीज आणि क्लायंट सर्व्हिसेसचं प्रशिक्षण देण्यात आलं. आता हे तरुण त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करीत आहेत. ‘ग्लोबल कस्टमर’ कंपनीला नुकताच ‘बीपीओ ऑफ दी इयर’ पुरस्कार मिळाला. कंपनीला नवीन वर्क ऑर्डर मिळत असून, व्यवसायात वृद्धी होत असल्याचे नायर यांनी सांगितले.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement