SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘अ‍ॅमेझाॅन’ व ‘फ्लिपकार्ट’च्या सेलमध्ये ‘या’ वस्तूंवर मोठा डिस्काऊंट, ग्राहकांचा होणार फायदा…

सणासुदीच्या दिवसात बाजारात खरेदीचा उत्साह दिसून येतो.. त्यात आजपासून (ता. 23) ‘अ‍ॅमेझाॅन’ व ‘फ्लिपकार्ट’ या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ‘मेगा सेल’ सुरु झाला आहे. ‘अ‍ॅमेझाॅन’चा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेल 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे, तर ‘फ्लिपकार्ट’च्या ‘बिग बिलियन डेज्’ सेलमध्ये (Flipkart’s Big Billion Days Sale 2022) 30 सप्टेंबरपर्यंत खरेदी करता येईल.

‘अ‍ॅमेझाॅन’ (Amazon Great Indian Sale) व ‘फ्लिपकार्ट’कडून आपल्या प्राईम मेंबरसाठी एक दिवस आधीच सेल सुरु केला होता. यंदाच्या सणासुदीला नवीन वस्तू घेण्याचा विचार असल्यास, या सेलमध्ये घेता येणार आहे. दोन्ही ई-काॅमर्स कंपन्यांकडून विविध वस्तूंवर घसघशीत डिस्काऊंट जाहीर केले आहेत. या सेलमध्ये कोणत्या वस्तूंवर किती सूट मिळत आहे, हे जाणून घेऊ या..

Advertisement

कोणत्या वस्तूवर किती सूट..?

फ्रिज – ‘फ्लिपकार्ट’च्या सेलमध्ये फ्रीज खरेदीवर तब्बल 53 टक्के सूट मिळत आहे. तुम्हाला अर्ध्या किमतीत नवा फ्रीज खरेदी करता येणार आहे. अगदी मोठ्या ब्रँडच्या फ्रीजवरही 30 ते 35 टक्के डिस्काऊंट दिला जात आहे. शिवाय ‘अ‍ॅमेझाॅन’वरही फ्रीज खरेदीवर 50 टक्के सूट मिळत आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर ‘एक्सचेंज ऑफर’सह विविध ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.

Advertisement

वॉशिंग मशिन – या मेगा सेलमध्ये अगदी 5000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ‘वॉशिंग मशीन’ खरेदी करता येईल. चांगल्या ब्रँडच्या पूर्णपणे स्वयंचलित ‘वॉशिंग मशिन’देखील मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. ‘फ्लिपकार्ट’च्या सेलमध्ये वाॅशिंग मशीनवर 59 टक्के, तर ‘अ‍ॅमेझाॅन’वर 45 टक्के सूट दिली आहे..

एसी – ‘फ्लिपकार्ट’वर नवीन एसी 60 टक्क्यांपर्यंत सवलतीत उपलब्ध आहे. दुसरीकडे ‘अ‍ॅमेझाॅन’वरही 45 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. या सेलमध्ये चांगल्या ब्रँडचा 5-स्टार दीड टन  एसी खरेदीवर तब्बल 5-7 हजार रुपयांची बचत करता येणार आहे.

Advertisement

उबदार कपडे – हिवाळा ऋतू लवकरच सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर या फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये स्वस्तात उबदार कपडे खरेदी करता येतील. ‘अ‍ॅमेझाॅन’वर उबदार कपड्यांची रेंज फक्त 199 रुपयांपासून सुरू होत आहे. तर, ‘फ्लिपकार्ट’कडूनही किमान 50 टक्के सूट देण्याचा दावा करण्यात आला आहे..

शिलाई मशीन – ‘अ‍ॅमेझाॅन’वर शिलाई मशीनच्या खरेदीवर 78 टक्के, तर फ्लिपकार्टवर 79 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

Advertisement

सोफा – या सेलमध्ये अर्ध्यापेक्षा कमी किमतीत नवीन सोफा खरेदी करता येईल. ‘अ‍ॅमेझाॅन’वर 80 टक्के, तर ‘फ्लिपकार्ट’वर सोफा खरेदी केल्यास 75-80 टक्के सूट मिळत आहे.

वॉटर प्युरिफायर – फ्लिपकार्ट सेलमध्ये वॉटर प्युरिफायरवर 72 टक्के सूट मिळत आहे. ‘अ‍ॅमेझाॅन’वरही वॉटर प्युरिफायरवर 76 टक्के सूट देत आहे.

Advertisement

पंखे व गीझर – फ्लिपकार्टवर हे दोन्ही उपकरणे 199 रुपयांपासून उपलब्ध आहेत. फ्लिपकार्टवर पंखे व गिझरवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. ‘अ‍ॅमेझाॅन’च्या सेलमध्ये या उपकरणांवर 70 टक्के सूट आहे.

सायकल – सायकल खरेदीवर ‘अ‍ॅमेझाॅन’वर 80 टक्के सूट देत आहेत, म्हणजेच 50 हजारांची सायकल फक्त 10 हजार रुपयांत खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवरही सायकल खरेदीवर 37 टक्के सूट दिली जात आहे.

Advertisement

इस्त्री- फ्लिपकार्ट सेलमध्ये 81 टक्क्यांपर्यंत सवलत आहे, तर ‘अ‍ॅमेझाॅन’वर 74 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement