SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): निराशाजनक विचार टाळावेत. आपलेच म्हणणे खरे कराल. गरजेच्या वस्तु खरेदी कराल. मौसमी आजारांपासून काळजी घ्यावी. चैनीवर खर्च कराल. आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे.

वृषभ (Taurus): मनातील इच्छा पूर्ण होईल. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन योजनांकडे बारीक लक्ष ठेवा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल.

Advertisement

मिथुन (Gemini) : मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे लागेल. योग्य वेळेची वाट पहावी. भावंडांशी मतभेद टाळावेत. निर्धारित कामात आळस करू नका. स्वत:साठीही थोडा वेळ काढावा. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल.

कर्क (Cancer) : मुलांशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात. व्यापारात जोखीम पत्कारावी लागेल. दिवस अनुकूल राहील. संयमाने समस्या सुटू शकतात. बरेच दिवसानी नातेवाईकांची गाठ पडेल. आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी भेट होईल. दिवस आनंदात व्यतीत कराल.

Advertisement

सिंह (Leo) : नवीन ओळखी होतील. हस्तकलेला वाव द्यावा. मानसिक संतुलन राखावे. भावंडांना मदत कराल. चांगले साहित्य वाचनात येईल. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धन आणि प्रतिष्ठेची हानी असे कृत्य करू नका. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा.

कन्या (Virgo) : नवीन कल्पना कृतीत आणाल. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने कामे करावीत. हातून शुभकार्य घडेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल.

Advertisement

तुळ (Libra) : दिवसभर संयम बाळगावा लागेल. कामात दिवसभर गढून जाल. काही नवीन खरेदी करण्याची संधी लाभेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभाची शक्यता. घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल.

वृश्‍चिक (Scorpio) : महत्त्वाच्या कामात यश मिळेल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका. ताणतणाव, दडपणाच्या मनःस्थितीवर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. जोडीदाराची काळजी घ्या.

Advertisement

धनु (Sagittarius) : ज्येष्ठ मंडळींशी तारतम्यतेने वागा. स्वत:विषयीचा चुकीचा ग्रह काढून टाका. जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करा. अनावश्यक खर्च टाळा. आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची भीती आहे. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. जिभेवर ताबा ठेवा.

मकर (Capricorn) : जोडीदाराकडून तुमची इच्छा पूर्ण होईल. जमिनीच्या कामात गुंतवणूक कराल. दैनंदिन कामात थोडासा बदल करून पहावा. समोर आलेली संधी ओळखा. आईशी वादाचे प्रसंग टाळावेत. व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

Advertisement

कुंभ (Aquarious) : आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. दिवसभर कामाचा ताण राहील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. नवीन कामाची योजना आखाल. गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. मानप्रतिष्ठा भंग पावेल. गुंतवणूक करताना सावध राहावे.

मीन (Pisces) : जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. नातेवाईकांना मदत कराल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. योजनाबद्ध कामे करावीत. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाका. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. घरातील सदस्यांचे सल्ले ऐका.

Advertisement