SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ऑनलाईन सेल’मध्ये स्मार्टफोन घेताना ‘या’ चूका टाळा, नाहीतर ‘ऑफर्स’ पडेल महागात..!!

‘अमेझाॅन’ व ‘फ्लिपकार्ट’ (Amezon and Flipkart) या भारतातील दिग्गज ई-काॅमर्स कंपन्यांच्या ‘मेगा सेल’ला (Mega sale) आजपासून (ता. 23) सुरुवात होत आहे. या कंपन्यांकडून विविध वस्तूंवर ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. सध्या बाजारातून थेट वस्तू विकत घेण्याऐवजी, ग्राहकही ई-काॅमर्स कंपन्यांच्या ऑफर्सला भुलून ऑनलाईन खरेदी करीत असतात..

ई-काॅमर्स कंपन्यांच्या सेलमध्ये सर्वाधिक आकर्षण असतं, ते स्मार्टफोनचं..! ही बाब लक्षात घेऊन कंपन्यांही विविध स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर (Offers) जाहीर करतात. मात्र, ऑनलाईन वेबसाईटवर स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, नाहीतर फसवणूक होऊ शकते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या…

Advertisement

काय काळजी घ्याल..?

गरजेनुसार स्मार्टफोनची निवड
प्रत्येक मोबाईल युजर्सच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारचा स्मार्टफोन हवा आहे, हे समजून घ्या. तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे तुमची गरज ओळखून स्मार्टफोन निवड करा.

Advertisement

तुमचे बजेट ठरवा
ई-काॅमर्सच्या सेलमध्ये विविध स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. मात्र, स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी तुमचे बजेट किती आहे, हे ठरवा. त्यानंतर तुम्हाला बजेटमध्ये आवश्यक असणारा स्मार्टफोन निवडणे सोपे होईल.

ब्रॅंडबरोबरच हेही पाहा
अनेकांना विविष्ट कंपनीचेच स्मार्टफोन आवडतात. मात्र, तुम्ही खरेदी करीत असलेल्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे, त्यात किती रॅम आहे, प्रोसेसर कसा आहे, हे समजून घ्या. कारण, स्मार्टफोन चालण्याचा वेग आणि स्तर प्रोसेसर आणि रॅमवरच अवलंबून असतो..

Advertisement

बॅटरी आणि कॅमेरा
स्मार्टफोनमधील बॅटरी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे फोनमधील बॅटरीचे आयुष्य किती आहे, हे निश्चित जाणून घ्या. सध्या ‘कॅमेरा’लाही विशेष महत्व आहे. कॅमेराचे रिझोल्यूशन, मागील कॅमेरा, फ्रंट कॅमेरा, एलईडी फ्लॅश, ऑटो फोकस यांसह व्हिडीओ रेकॉर्डिंगबद्दलचे तपशील जाणून घ्या

स्मार्टफोनची स्क्रीन
साधारणत: 4-5 इंच स्क्रीन असणारा स्मार्टफोन अधिक चांगला मानला जातो, कारण तो हातात धरून ठेवणंही आरामदायी असतं. तुम्ही 4.5-5 इंच डिस्प्ले असल्यास, त्याचे रिझोल्यूशन किमान 720 पिक्सेल असावे. 5 इंचांपेक्षा मोठ्या डिस्प्लेसाठी फुल-एचडी रिझोल्यूशन (1020 पिक्सेल) आवश्यक आहे..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement